परभणी - 'कृषीप्रधान' असलेल्या देशात कृषी शिक्षणालाच व्यावसायिक दर्जा नसल्यामुळे कृषी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या शेतकरी मुलांच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण शुल्क आणायचे कोठून? असा प्रश्न करत बंद करण्यात आलेली शिष्यवृत्ती चालू करावी व कृषी शिक्षणाला व्यवसायिक दर्जा द्यावा, अशी प्रमुख मागणी परभणीच्या कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन करुन केली आहे.
हेही वाचा - सेवा क्षेत्राचा जानेवारीत 55.5 टक्के वृद्धीदर; सात वर्षातील उच्चांक
जवळपास 1 हजार विद्यार्थ्यांनी आजपासून कुलगुरुंच्या कार्यालयापुढे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. यावेळी संबंधित आंदोलनार्थी विद्यार्थ्यांशी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. आंदोलनकर्ते विद्यार्थी म्हणाले, 'एमसीआर'च्या जाचक अटींविरुध्द हे अंदोलन आहे. त्याच्या विरोधात चारही कृषी विद्यापीठामध्ये धरणे आंदोलन करण्यात येत आहे. त्यानुसार परभणी देखील हे आंदोलन आम्ही करत आहोत, यामध्ये प्रामुख्याने एमसीआरने लादलेल्या जाचक अटी दूर कराव्यात, शुल्क कमी करावे अशा मागण्या विद्यार्थी आंदोलकांनी केल्या आहेत. तसेच आम्ही शेतीचे डॉक्टर आहोत, त्यामुळे आमच्या शिक्षणाला व्यावसायिक दर्जा मिळाला पाहिजे, अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांनी यावेळी कोली आहे.
हेही वाचा - शरीर सुखासाठी नकार दिल्याने महिलेला जिवंत जाळले