ETV Bharat / state

परभणीत हजारो कोरोना संशयित रुग्ण, जिल्हा अद्याप कोरोनामुक्त

author img

By

Published : May 7, 2020, 8:33 AM IST

परभणी जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्या 1 हजार 21 पर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी आतापर्यंत 983 जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 914 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 50 स्वॅबचे अहवाल प्रलंबित आहेत.

परभणीत हजारो कोरोना संशयित रुग्ण
परभणीत हजारो कोरोना संशयित रुग्ण

परभणी - जिल्ह्यातील कोरोना संशयितांची संख्या एक हजाराहून अधिक झाली आहे. मात्र, असे असले तरी सद्यपरिस्थितीत जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. यापूर्वी पुणे येथून चोरट्या मार्गाने परभणीत आलेला हिंगोली येथील तरुण कोरोना पॉझिटिव्ह आला होता. मात्र, तो ठणठणीत बरा होऊन घरी परतला आहे.

आता बुधवारी हिंगोलीचाच एक तरुण पुण्यातून पायी आला. त्याला गुजरी बाजारात सतर्क तरुणाने पकडून जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा परभणीकरांची चिंता वाढली आहे. आतापर्यंतच्या परिस्थितीवरून परभणी 'आऊट ऑफ डेंजर' आहे, मात्र, शेजारच्या जिल्ह्यांमधील रुग्णांची वाढती संख्या पाहता, परभणीकरांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

परभणी जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्या 1 हजार 21 पर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी आतापर्यंत 983 जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 914 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 50 स्वॅबचे अहवाल प्रलंबित आहेत. बुधवारी 22 जणांचे स्वॅब नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

सध्या परभणी जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात 383 जण तर संसर्गजन्य कक्षात 49 जण ठेवण्यात आले आहेत. आतापर्यंत विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले 589 जण आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली आहे.

"पुण्याहून पायी आलेला युवक रुग्णालयात"

पुण्याहून पायी निघालेला युवक बुधवारी सायंकाळी परभणीच्या गांधी पार्क, गुजरी बाजार मार्गे हिंगोली जिल्हातील जवळाबाजार येथे जात होता. ही बाब गुजरी बाजार येथील अमित पाचलिंग या तरुणाच्या निदर्शनास आल्याने अमितने सतर्कता दाखवत युवकाला थांबवून ठेवले. यानंतर मित्रांच्या सहाय्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्याचा स्वॅबदेखील तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. गुजरी बाजारातील ज्या-ज्या भागात तो युवक थांबला तो भाग महापालिकेकडून निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे.

परभणीत यापूर्वी आढळलेला एकमेव कोरोनाबाधित रुग्ण हा हिंगोली जिल्ह्यातील जवळाबाजार या ठिकाणचाच होता. तो पुण्याहून चोरट्या मार्गाने येऊन हिंगोलीकडे जाण्यापूर्वी परभणीत आपल्या मेव्हण्याला भेटण्यासाठी आला होता. मात्र, मेव्हण्याने सतर्कता दाखवत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आता बुधवारी पुण्यातून पायी आलेला युवकदेखील हिंगोली जिल्ह्यातीलच असल्याने पुन्हा एकदा परभणीकरांची चिंता वाढली आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.