परभणी - शहर महानगरपालिका अंतर्गत नागरी दलित वस्ती सुधार योजना, दलितोत्तर योजना व राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानतंर्गत नवीन सामुहिक आरोग्य केंद्राच्या कामाचे तसेच विविध रस्ते, नाल्या आदी विकास कामांचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार सुरेश वरपूडकर यांच्या हस्ते आज रविवारी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. ही सर्व कामे 31 कोटी 15 लाखांची असून यामध्ये सुमारे 170 कामांचा समावेश आहे.
या संदर्भात शहरातील बी. रघुनाथ सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत वरपूडकर यांनी या विविध विकास कामांची माहिती दिली. यावेळी महापौर अनिता सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे, सभागृह नेते माजू लाला, सभापती गुलमीर खान, विरोधी पक्षनेते विजय जामकर, रविंद्र सोनकांबळे, गटनेते चंदू शिंदे, मंगल मुद्गलकर, जाकेर लाला आदी उपस्थित होते.
विकासकामांचे ऑनलाईन उद्घाटन 8 कोटींच्या रुग्णालयाचे देखील उदघाटन -सदर विकास कामांमध्ये दलितोत्तर योजनेतंर्गत 52 कामे आहेत. तर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानतंर्गत नवीन सामूहिक आरोग्य केंद्राचे काम होणार आहे. यामध्ये 8 कोटी रुपयांच्या 60 खाटांच्या रुग्णालयाचा समावेश आहे. हे रुग्णालय जायकवाडी परिसरातील कल्याण मंडपमच्या मागील बाजूस होणार असल्याची माहिती आमदार सुरेश वरपूडकर यांनी दिली.
दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत 115 कामे -
नागरी दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये रस्ता मजबुतीकरण, सी.सी.नाली, पेवर ब्लॉक बसविणे, प्रभाग क्रमांक 3 मध्ये पेवर रस्ता, रस्ता मजबुतीकरण, नाली बांधकाम, प्रभाग क्रमांक 4 मध्ये पेवर रस्ता, नाली बांधकाम, प्रभाग क्रमांक 5 मध्ये नाली बांधकाम, पेवर ब्लॉक रस्ता, रविराज पार्क येथील मोकळ्या जागेत विपश्यना केंद्र बांधणे, प्रभाग क्रमांक 6 मध्ये पेवर ब्लॉक रस्ता, नाली बांधकाम, प्रभाग क्रमांक 7 मध्ये पेवर रस्ता बांधकाम, प्रभाग क्रमांक 9 मध्ये पेव्हर रस्ता, नाली बांधकाम, प्रभाग क्रमांक 10 मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे, पेव्हर रस्ता, सी.सी.नाली, प्रभाग क्रमांक 12 मध्ये रस्ताचे मजबुतीकरण, सी.सी.नाली, प्रभाग क्रमांक 13, पेव्हर रस्ता, सी.सी.नाली, प्रभाग क्रमांक 14 मध्ये पेव्हर रस्ता, नाली बांधकाम, प्रभाग क्रमांक 15 मध्ये रस्ता, रस्ता मजबुतीकरण, पेव्हर रस्ता, प्रभाग 16 मध्ये पेव्हर रस्ता, प्रभाग तीन मध्ये डब्ल्यूबीएम रस्ता, डांबरी रस्ता,प्रभाग 4 मध्ये डांबरी रस्ता, प्रभाग क्रमांक 6 मध्ये डांबरीकरण रस्ता, प्रभाग क्रमांक 10 मध्ये डांबरी रस्ता, पेवर रस्ता व सुशोभिकरण, प्रभाग क्रमांक 12 मध्ये रस्ता बांधकाम, रस्ता मजबुतीकरण, प्रभाग क्रमांक 13 मध्ये डांबरीकरण रस्ता, प्रभाग क्रमांक 15 डांबरीकरण रस्ता, प्रभाग क्रमांक 16 मध्ये डांबरीकरण रस्ता पेव्हर रस्ता, प्रभाग क्रमांक 1 मध्ये सी.सी.नाली, प्रभाग क्रमांक 4 मध्ये पेव्हर रस्ता, नाली बांधकाम, प्रभाग क्रमांक 5 मध्ये पेव्हर रस्ता, नाली बांधकाम, प्रभाग क्रमांक 6 मध्ये डांबरीकरण रस्ता, प्रभाग क्रमांक 7 मध्ये नाली व पेव्हर ब्लॉक काम, प्रभाग क्रमांक 9 मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूने सुशोभिकरण, प्रभाग क्रमांक 12 मध्ये रस्त्याचे डांबरीकरण, प्रभाग क्रमांक 13 मध्ये नाली बांधकाम व पेव्हर रस्ता करणे आदी विकास कामे करण्यात येणार आहेत. या विविध विकास कामांच्या उदघाटनाप्रसंगी महानगरपालिका सदस्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.