ETV Bharat / state

परभणीत नवीन 220 कोरोना रुग्ण, 8 मृत्यू - परभणी कोरोना मृत्यू

परभणी जिल्ह्यात आज 220 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. 8 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 112 कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या 47 हजार 861 वर पोहोचली आहे.

parbhani
परभणी
author img

By

Published : May 22, 2021, 10:12 PM IST

परभणी - जिल्ह्यात आज (22 मे) 220 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 112 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून परभणीतील रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे.

2 हजार 985 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह

परभणी जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 47 हजार 861वर पोहचली आहे. त्यातील 43 हजार 686 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उर्वरीत 2 हजार 985 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून यात काहीसा दिलासा मिळताना दिसून येत आहे. 1 मेपासून आजपर्यंत दररोज आढळणाऱ्या बाधितांपेक्षा बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

आतापर्यंत 3 लाख 3 हजार 345 जणांची तपासणी

परभणी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण ज्या प्रमाणात वाढत होते; आता त्याच प्रमाणात घटतानाही दिसून येत आहेत. आज 220 नवीन बाधित आढळले. 112 कोरोनामुक्त झाले. तसेच गेल्या 24 तासात 8 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या जिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांच्या कोरोना कक्षात 2 हजार 985 बाधित उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत एकूण 1 हजार 190 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 47 हजार 861 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 43 हजार 686 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत 3 लाख 3 हजार 345 नमुने तपासण्यात आले. त्यात 2 लाख 55 हजार 305 नमुने निगेटिव्ह आले. तर 47 हजार 861 नमुने पॉझिटिव्ह आले. 1130 अनिर्णायक आहेत व 140 नमुने नाकारण्यात आले.

8 बाधितांचा मृत्यू

गेल्या 24 तासात जिल्ह्यात 8 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. यात 6 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. यात सर्वाधिक 3 मृत्यू जिल्हा परिषदेच्या कोविड सेंटरमध्ये झाला आहे. तर जिल्हा रुग्णालयाच्या आयटीआय इमारतीमधील कोरोना हॉस्पिटलमध्ये 1 आणि शहरातील पार्वती, स्वाती, सूर्या आणि देशमुख या खासगी हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी 1 अशा एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - खुशखबर! आजपासून राज्यातील रिक्षा चालकांना मिळणार आर्थिक मदत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.