ETV Bharat / state

जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या असमन्वयाचा नागरिकांना फटका; खासदार संजय जाधवांचा आरोप

author img

By

Published : Apr 4, 2021, 10:46 AM IST

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. जिल्हा प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून परभणीमध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय जाधव यांनी जिल्हा रूग्णालयाची पाहणी केली.

MP Sanjay Jadhav
खासदार संजय जाधव

परभणी - 'जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसून, याचा फटका नागरिकांना बसत आहे. जिल्हा रुग्णालयातील 15 कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. त्यांच्याकडे या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी लक्ष देत नाहीत तर, सामान्यांचे काय रक्षण करणार? असा प्रश्न खासदार संजय जाधव यांनी उपस्थित केला आहे. जिल्हा रूग्णालयातील एका रूग्णाला ऑक्सिजन न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार शनिवारी पहाटे घडला. त्यानंतर खासदार संजय जाधव, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण जिल्हा रूग्णालयाची पाहणी करून अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

खासदार संजय जाधव यांनी जिल्हा रूग्णालयाची पाहणी केली

परभणीच्या जिल्हा रुग्णालयातील 'सारी' वार्डात शनिवारी पहाटे एका 65 वर्षीय रूग्णाचा ऑक्सिजन अभावी तर अन्य एका रूग्णाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. रूग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हे मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी गोंधळ घातला आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या पार्श्वभूमीवर खासदार संजय जाधव, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्हा रूग्णालयात शनिवारी दुपारी बैठक घेऊन जिल्हा शल्य चिकित्सकांसह इतर वैद्यकीय अधिकार्‍यांना धारेवर धरले.

जिल्हा रुग्णालयाची अत्यंत दयनीय अवस्था -

शनिवारी पहाटे घडलेल्या प्रकारामुळे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांसह मी जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. रूग्णालयाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे या पाहणीत दिसले. या ठिकाणी कोरोनाबाधित रूग्णांना उपचार न मिळाल्याने तो दगावल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी धुडगूस घालून काही कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यांच्या म्हणण्यानुसार कॉल करून देखील डॉक्टर वेळेवर आले नाही, म्हणून रूग्ण दगावला. लोकांची ही प्रतिक्रिया नैसर्गिक आहे. मात्र, जिल्हा रुग्णालयात जे कोणी वैद्यकीय अधिकारी असतील त्यांनी आपली नैतिक जबाबदारी पार पाडली असती तर असले प्रकार झाले नसते, असे खासदार जाधव म्हणाले.

जिल्हा शल्य चिकित्सक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव -

'जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली असता, या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसले. याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळेच असले प्रकार घडत असल्याचे खासदार जाधव म्हणाले. जिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना कोरोना झाला असून, त्या रुग्णांकडे या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी पाहत नाहीत. कर्मचाऱ्यांना भेट सुद्धा दिलेली नाही. जे आपल्या कर्मचाऱ्यांकडे पाहत नाहीत ते सामान्य जनतेचे काय रक्षण करत असतील? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी जिल्हा रूग्णालयाची स्थिती भयावह असल्याचे सांगितले. दरम्यान, या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य उपसंचालकांशी संवाद साधला असून, आपण देखील मुख्यमंत्री कार्यालयात बोललो आहोत. त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसात या ठिकाणची परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा देखील खासदार जाधव यांनी व्यक्त केली.

सर्वच वरीष्ठ अधिकाऱ्यांची होती उपस्थिती-

जिल्हा रूग्णालयातील गेल्या वर्षभरात अनेक भोंगळ कारभार उघडकीस आले आहेत. यापूर्वीदेखील ऑक्सिजन अभावी एका रूग्णाचा मृत्यू झाला होता, तर काही रुग्णांचा उपचाराअभावी जीव धोक्यात आला होता. आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या. त्यानंतर आजच्या घटनेची सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने नोंद घेवून जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आरोग्य उपसंचालकांशी मोबाईलवरून संवाद साधून जिल्हा शासकीय रूग्णालयात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार मुळीक, उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, उपविभागीय अधिकारी महेश वडदकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.प्रकाश डाके, तहसीलदार संजय बिरादार यांच्यासह पोलीस निरीक्षक रामेश्वर तट, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड, प्रवीण धुमाळ व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - उद्रेक.. राज्यात शनिवारी कोरोना रुग्णांची संख्या ५० हजाराच्या उंबरठ्यावर, २७७ जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.