परभणी - जिल्ह्यात बुधवारी 453 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 22 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1072 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, गेल्या 11 दिवसांप्रमाणे आजदेखील नवीन बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, दुसरीकडे मृत्यूचे प्रमाण कायम असल्याने चिंतादेखील व्यक्त होत आहे.
4 हजार 703 कोरोनाबाधितांवर उपचार -
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा मार्च महिण्याच्या शेवटच्या आठवड्यापासून वाढत आहे. त्यात एप्रिल महिन्यात प्रचंड वाढ झाली. मात्र, आता बधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या 44 हजार 416 वर पोहचली असून, त्यातील 4 हजार 703 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून यात काहीसा दिलासा मिळताना दिसून येत आहे. 1 मेपासून आजपर्यंत दररोज आढळणाऱ्या बाधितांपेक्षा बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या काळात नव्याने 8053 बाधित आढळले, तर 11 हजार 348 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
22 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू -
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण ज्या प्रमाणात वाढत होते, आता त्याचे प्रमाणात घटताना दिसून येत आहेत. बुधवारी 453 नवीन कोरोनाबाधित आढळले, तर 1072 कोरोनामुक्त झाले. तसेच गेल्या 24 तासांत 22 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या जिल्हा रुग्णालयातील कक्षात 4 हजार 703 बाधित सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत एकूण 1 हजार 75 करोनाबाधितांचा मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 44 हजार 416 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 38 हजार 638 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत 2 लाख 69 हजार 268 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 2 लाख 24 हजार 733 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले, तर 44 हजार 416 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले. 1070 अनिर्णायक व 140 नमुने नाकारण्यात आले.
या रुग्णालयांमध्ये मृत्यूची नोंद -
दरम्यान, गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 22 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात 16 पुरुष तर 6 महिलांचा समावेश आहे. यात सर्वाधिक मृत्यू जिल्हा रुग्णालयाच्या आयटीआय इमारतीमधील कोरोना हॉस्पिटलमध्ये 5, जिल्हा रुग्णालयात 4 तर जिल्हा परिषदेच्या कोविड सेंटरमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय पूर्णा शासकीय रुग्णालयात 1 तर देशमुख हॉस्पिटलमध्ये 3 आणि चिरावू, परभणी आयसीयू, सिद्धिविनायक, पाडेला, धानोरकर या खासगी हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी 1 अशा एकूण 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात 788 बेड शिल्लक -
दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना हॉस्पिटल्ससह खासगी मंगल कार्यालय आणि इतर इमारतीमधून 31 कोरोना हॉस्पिटल सुरू असून या रुग्णालयांमध्ये 1910 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी सध्या 788 बेड रिकामे आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयात 2, तर जिल्हा रुग्णालयाच्या आयटीआय हॉस्पिटलमध्ये 63 बेड, जिल्हा परिषद कोरोना हॉस्पिटल 68, परभणी आयसीयू 4, स्वाती 18, पाडेला 13, भारत हॉस्पिटल 39, डॉ.प्रफुल पाटील हॉस्पिटल 45, देशमुख 9, अक्षदा मंगल कार्यालय 107, सूर्या 13, प्राईम 27, मोरे 7, अनन्या 2, सामले 3, सिद्धिविनायक 4, ह्यात 11, सुरवसे मॅटर्निटी 5, पाडेला(2)- 21, पार्वती 11, रेणुका 227, देहरक्षा 15, स्पर्श हॉस्पिटल 14, गोकुळ 8, पोले 31, पांडुरंग 16 तर कान्हेकर या खाजगी हॉस्पिरटलमध्ये 7 बेड शिल्लक आहेत. तर 3 हजार 581 रुग्ण घरून (होम आयसोलेशन) उपचार घेत आहेत. दरम्यान, नव्याने बाधित होणाऱ्या कोरोना रुग्णांनी बेड शिल्लक नसल्याच्या अफवांवर विश्वास न ठेवता या रुग्णालयांमध्ये संपर्क साधून उपचार घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.