ETV Bharat / state

सासरवाडीतील मोबाईल शॉपीवर जावयाचा डल्ला; 10 लाखांचे मोबाईल लंपास - परभणी क्राईम बातम्या

पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी करत होते. त्यांना या चोरीप्रकरणी मालेगाव येथील एका सराईत गुन्हेगारावर संशय होता. मात्र, तो गुन्हेगार मोबाईल वापरत नसल्याने तसेच प्रत्येक वेळी ठिकाण बदलत असल्याने त्याचा नेमका ठावठिकाणा पोलिसांना लागत नव्हता.

परभणी
परभणी
author img

By

Published : Nov 22, 2020, 7:31 PM IST

परभणी - जिल्ह्यातील जिंतूर येथे सासरवाडीत आलेल्या जावयाने शहरातील एक मोबाईलचे दुकान फोडून तब्बल 10 लाख रुपयांचे मोबाईल लंपास केले होते. तडीपार आणि सराईत गुन्हेगार असलेल्या या आरोपीला सायबर शाखेच्या तांत्रिक मदतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने मालेगाव (जि.नाशिक) येथून ताब्यात घेतले. या गुन्हेगाराकडून 26 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

चोरट्याने जिंतूर येथे 10 नोव्हेंबर रोजी एक मोबाईल शॉपी फोडून 10 लाख रुपयांचे विविध कंपनीचे मोबाईल पळवले होते. पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी करत होते. त्यांना या चोरीप्रकरणी मालेगाव येथील एका सराईत गुन्हेगारावर संशय होता. मात्र, तो गुन्हेगार मोबाईल वापरत नसल्याने तसेच प्रत्येक वेळी ठिकाण बदलत असल्याने त्याचा नेमका ठावठिकाणा पोलिसांना लागत नव्हता.

चोरीला गेलेल्या मोबाईलच्या लोकेशनवरून चोरट्याचा लागला सुगावा

दरम्यान, चोरीस गेलेल्या मोबाईलपैकी एक मोबाईल मालेगाव परिसरात वापरात येत असल्याचे सायबर शाखेच्या मदतीने निष्पन्न झाले. त्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, कर्मचारी हनुमंत जक्केवाड, शेख अजहर, दिलावर पठाण, संजय घुगे यांचे पथक मालेगाव येथे रवाना झाले. सायबर शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड, कर्मचारी गणेश कौटकर, राजेश आगाशे, व्यवहारे यांच्या तांत्रिक मदतीने स्थानिक गुन्हे शाखेस हवा असलेला मोहमद मुस्तफा अब्दूल रशीद (वय 34, रा. कमालपुरा मालेगाव, जि.नाशिक) यास काल (शनिवारी) रात्री मोठ्या शिताफीने मालेगाव येथून ताब्यात घेतले. मोहम्मद मुस्तफा यास मालेगावमधून तडीपार करण्यात आले आहे. राज्यासह राज्याबाहेरही त्याच्या टोळीने जबरी चोर्‍यांसह घरफोडी केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

अन्य दोन आरोपी मोबाइलसह ताब्यात

पोलिसांनी मोहम्मद मुस्तफाच्या घरातून चोरीला गेलेल्यांपैकी काही मोबाईल जप्त केले. तसेच त्याची सासरवाडी जिंतूर येथील असल्याचे तपासात पोलिसांना समजले. त्यामुळे जिंतूर पोलीस ठाण्याचे फौजदार रवी मुंडे व कर्मचाऱ्यांनी जिंतूर येथे चोरलेल्या मोबाईलचा शोध घेतला. तसेच मोहम्मद मुस्तफा याने चोरलेले दोन मोबाईल बहिणीचा नवरा मोहम्मद मुजम्मील फारूक अहेमद व अन्य दोन मोबाईल उबेदूर रेहमान मोहमद शरीक (दोघेही रा.नयापूरा मालेगाव) यांना दिल्याचे पथकास सांगितले. त्यावरून त्या दोघांनाही पोलिसांनी मोबाईलसह ताब्यात घेतले आहे. पोलिसांना चोरीला गेलेल्या मोबाईलपैकी 26 मोबाईल ताब्यात घेण्यात यश आले आहे. पुढील तपास जिंतूर पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.