ETV Bharat / state

'...तर साई जन्मस्थळासाठी न्यायालयात जाऊ' - आमदार बाबाजानी दुर्रानी

साई बाबा जन्मस्थळासंदर्भात न्यायालयात जाऊन न्यायालयासमोर पुरावे सादर करू आणि न्यायालयाच्या माध्यमातून शासनाला संशोधन समिती स्थापन करण्यास भाग पाडू, असा इशारा साई जन्मस्थळ समितीचे अध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी दिला आहे.

आमदार बाबाजानी दुर्रानी
आमदार बाबाजानी दुर्रानी
author img

By

Published : Jan 23, 2020, 5:05 PM IST

परभणी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी येथील साईबाबा जन्मस्थळाच्या वादावर पडदा टाका, अशी सूचना खासदार संजय जाधव यांना काल (दि. 22 जानेवारी) दिल्यानंतर आज (दि. 23 जानेवारी) पाथरीत साई जन्मस्थळ समितीचे अध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी या प्रकरणी न्यायालयात जाऊन न्यायालयासमोर पुरावे सादर करू आणि न्यायालयाच्या माध्यमातून शासनाला संशोधन समिती स्थापन करण्यास भाग पाडू, असा इशारा दिला आहे.

..तर साई जन्मस्थळासाठी न्यायालयात जाऊ

मागील महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद दौऱ्यात साई जन्मस्थळ असलेल्या पाथरीत विकासासाठी शंभर कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिल्याची घोषणा केली होती. त्यानंतर शिर्डीवासियांनी साई जन्मस्थळावरून वाद निर्माण केला. एवढेच नव्हे तर, याच्या निषेधार्थ शिर्डी बंद ठेवली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डीच्या शिष्टमंडळाला भेटून पाथरीला तीर्थक्षेत्र म्हणून विकास निधी दिल्याचे सांगितल्याने शिर्डीकरांनी आंदोलन मागे घेतले. परंतु, या विरोधात परभणीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पाथरीत मंगळवारी (दि. 21 जानेवारी) ग्रामसभा घेऊन हा लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटून आमच्याकडील 29 पुराव्यांचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काल (दि. 22 जानेवारी) खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट घेतली. पण, मुख्यमंत्र्यांनी पाथरीवासियांना दिलासा देण्याऐवजी या मुद्द्यावर पडदा टाका, अशी सूचना दिल्याने पाथरीमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानुसार आज साईजन्मस्थळ मंदिर कृती समितीचे अध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी या प्रकरणी आपण न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा - एनआरसी विरोध; दिल्लीतील आंदोलनाला परभणीत पाठिंबा, बेमुदत धरणे आंदोलन सुरूच

शिर्डी ही साईबाबांची कर्मभूमी आहे, त्याप्रमाणेच पाथरी देखील जन्मभूमी आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही, त्यासाठीचे तब्बल 29 सबळ पुरावे आमच्याकडे आहेत. आम्ही हे पुरावे घेऊन न्यायालयात जाऊ. शासनाने समिती नेमावी, अशी मागणी न्यायालयात करणार आहे. एकूणच आता शासनाकडे दाद न मिळाल्याने पाथरीकर न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - 'पाथरी हीच साईबाबांची जन्मभूमी, दावा कधीही सोडणार नाही'

Intro:परभणी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी येथील साईबाबा जन्मस्थळाच्या वादावर पडदा टाका, अशी सूचना खासदार संजय जाधव यांना काल दिल्यानंतर आज पाथरीत साई जन्मस्थळ समिती चे अध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी या प्रकरणी न्यायालयात जाऊन न्यायालयासमोर पुरावे सादर करू आणि न्यायालयाच्या माध्यमातून शासनाला संशोधन समिती स्थापन करण्यास भाग पाडू, असा इशारा दिला आहे.Body:मागच्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागच्या महिन्यात औरंगाबाद दौऱ्यात साई जन्मस्थळ असलेल्या पाथरीत विकासासाठी 100 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिल्याची घोषणा केली होती. त्यानंतर शिर्डीवासीयांनी साई जन्मस्थळ यावरून वाद निर्माण केला. एवढेच नव्हे तर याच्या निषेधार्थ शिर्डी बंद ठेवली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डीच्या शिष्टमंडळाला भेटून पाथरीला तिर्थक्षेत्र म्हणून विकास निधी दिल्याचे सांगितल्याने शिर्डीकरांनी आंदोलन मागे घेतले. परंतु या विरोधात परभणीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पाथरीत मंगळवारी ग्रामसभा घेऊन हा लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटून आमच्या कडील 29 पुराव्यांचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काल बुधवारी खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी पाथरीवासियांना दिलासा देण्याऐवजी या मुद्द्यावर पडदा टाका, अशी सूचना दिल्याने पाथरी मध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानुसार आज साईजन्मस्थळ मंदिर कृती समितीचे अध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी या प्रकरणी आपण न्यायालयाचे दारं ठोठावणार असल्याचे सांगितले. शिर्डी ही साईबाबांची कर्मभूमी आहे, त्याप्रमाणेच पाथरी देखील जन्मभूमी आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही, त्यासाठीचे तब्बल 29 सबळ पुरावे आमच्याकडे आहेत. आम्ही हे पुरावे घेऊन न्यायालयात जाऊ. शासनाने समिती नेमावी, अशी मागणी न्यायालयात करणार आहे. एकूणच आता शासनाकडे दाद न मिळाल्याने पाथरीकर न्यायालयात दाद मागणार आहेत. न्यायालय आता काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- pbn_babajani_1_to_1_on_cmConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.