ETV Bharat / state

राज्यातील कोविड केअर सेंटर उभारणारी मानवत बाजार समिती ठरली पहिली - मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेवर मर्यादा पडत आहेत. अतिरिक्त ताण यंत्रणेला सहन करावा लागत आहे. यामुळे राज्य शासनाने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. याला प्रतिसाद देत मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीने तहसील कार्यालयाच्या परिसरात असलेल्या समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात या कोविड केअर सेंटरचे उदघाटन आज शनिवारी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या हस्ते झाले.

कोविड सेंटरचे उद्घाटन
कोविड सेंटरचे उद्घाटन
author img

By

Published : May 8, 2021, 5:54 PM IST

परभणी - राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी कोविड केअर सेंटर उभारण्याचे आवाहन राज्य सरकारने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत परभणी जिल्ह्यातील मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्यातील पहिले 80 बेडचे सर्व सुविधायुक्त केअर सेंटर उभारले आहे. आज शनिवारी हे कोविड केअर सेंटर सुरु झाले असून, यामुळे आरोग्य विभागावर येणारा ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे.

बाजार समित्यांना कोविड केअर सेंटरची परवानगी -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेवर मर्यादा पडत आहेत. अतिरिक्त ताण यंत्रणेला सहन करावा लागत आहे. यामुळे राज्य शासनाने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. याला प्रतिसाद देत मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीने तहसील कार्यालयाच्या परिसरात असलेल्या समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात या कोविड केअर सेंटरचे उदघाटन आज शनिवारी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे, तहसीलदार डीडी फुपाटे, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, गट विकास अधिकारी सुहास कोरेगावे, डॉ अंकुश लाड, पो नी रमेश स्वामी बाजार, सहाय्यक निबंधक पाठक, समितीचे संचालक महादेव नाणेकर, नारायण भिसे, ज्ञानेश्वर मोरे पाटील, बाबासाहेब आवचार, आसाराम निर्मळ. अंबादास तूपसमुद्रे, माणिकराव काळे, गिरिष कत्रुवार सचिव बालासाहेब कदम आदीच्या उपस्थितीत पार पडले.

सर्व सोयींनी युक्त 80 बेडची व्यवस्था -

मानवत बाजार समितीने सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये 80 बेडची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी वीज, शौचालय, सुविधा उपलब्ध केले असून, रुग्णासाठी भोजनाची तसेच पाण्याची व्यवस्थाही बाजार समितीने केली आहे. तसेच या ठिकाणच्या स्वच्छतेसाठीही बाजार समिती पुढाकार घेणार आहे. 9 मे पासून प्रत्यक्ष रुग्णांना या कोविड केअर सेंटर मध्ये दखल करता येणार आहे. प्रास्ताविक संचालक माधव नाणेकर यांनी सूत्रसंचालन सत्यशील धबडगे यांनी केले तर आभार बाबासाहेब अवचार यांनी मानले.

सहकार मंत्री पाटील यांच्या कडून कौतुक -

दरम्यान, या कोविड केअर सेंटरच्या उदघाटन कार्यक्रमाला सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पालक मंत्री नवाब मलिक, पणन सचिव अनुप कुमार, पणन संचालक सतीश सोनी, सहकार मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अविनाश देशपांडे, विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे, जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, जिल्हा बँकेच्या संचालक प्रेरणा वरपुडकर ऑनलाइन सहभागी झाले होते. मानवत बाजार समितीने सुरू केलेले हे कोविड केअर सेंटर राज्यातील पहिले बाजार समितीद्वारे चालविण्यात येणारे कोविड सेंटर ठरले आहे. राज्यभरातील इतर बाजार समित्यात देखील मानवत बाजार समितीचा पॅटर्न राबविण्यात येईल, अशी माहिती उद्घाटन कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी झालेले सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी देत या उपक्रमाचे कौतुक केले.

पालकमंत्री नवाब मलिक यांच्या प्रशासनाला सूचना

जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे सुद्धा कोरोना केअर सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमाला ऑनलाइन हजर होते. यावेळी बोलताना नवाब मलिक यांनी बाजार समितीने सुरू केलेला हा स्तुत्य उपक्रम असून, प्रशासनाच्या वतीने आवश्यक मदत करण्यासाठी सर्व सूचना देण्यात आल्या असल्याचे यावेळी सांगितले. जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांनी कोविड केअर सेंटर साठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री मलिक यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.