ETV Bharat / state

महाराष्ट्र व मध्य प्रदेश पोलिसांकडून मुख्य रस्त्यावर काटेरी कुंपण टाकून सीमा सील - महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमा बंद न्यूज

महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने 'ब्रेक द चेन' संदर्भातील कडक नियम लागू केले आहेत. त्यामुळे बाहेरच्या राज्यातील नागरिकांशीही संपर्क तोडला जात आहे. आता अमरावती जिल्ह्यातील धारणीपासून 40 किलोमीटर लांब असलेल्या बेरागड गावच्या सीमेवर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश पोलिसांनी मुख्य रस्त्यावर काटेरी कुंपण टाकले आहे. यामुळे दोन्ही राज्याचा असलेला मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे.

amravati
अमरावती
author img

By

Published : Apr 28, 2021, 5:35 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील धारणीपासून 40 किलोमीटर लांब असलेल्या बेरागड गावाच्या सीमेवर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश पोलिसांनी मुख्य रस्त्यावर काटेरी कुंपण टाकून दोन्ही राज्याचा असलेला मुख्य रस्ता बंद केला आहे. कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने 'ब्रेक द चेन' संदर्भातील कडक निर्बंध लागू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आल्याचे समजते आहे.

काटेरी कुंपण टाकून महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमा बंद प्रदेश

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. भारतात सर्वात जास्त कोरोना रूग्ण महाराष्ट्र राज्यात आहेत. त्यामुळे कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारने 'ब्रेक द चेन' संदर्भातील कडक निर्बंध लागू केले आहेत. त्या अनुषंगाने अमरावती शहर, ग्रामीण पोलीस दलातर्फे पोलीस ठाणे निहाय चोख बंदोबस्त व शहराच्या सीमावर्ती भागात चेक पोस्ट व सतर्क नाकाबंदी लावण्यात आलेली आहे. सीमावर्ती भागात कायदा व सुवव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. शहरातील नागरिकांना अत्यावश्यक कामानिमित्त आंतरराज्य किंवा आंतरजिल्ह्यात जाण्याकरिता ई-पासची सुविधा सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी संकेतस्थळावर ई-पास प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन पोलीस यंत्रणेने केले आहे.

मेळघाटात वाढू लागली कोरोना रुग्णसंख्या
मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत मेळघाटात कोरोना रुग्णांची संख्या स्थिर होती. परंतु आता होळीनंतर आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मेळघाटातली अनेक गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आधीच आरोग्य यंत्रणेची वानवा मेळघाटात आहे. त्यामध्ये आता कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने येथील आरोग्य विभागावर कमालीचा ताण वाढला आहे.

हेही वाचा - वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू; २ लाख ५ हजार रुपयांचे नुकसान

हेही वाचा - रिकामे ऑक्सिजन सिलिंडर लावल्याने रुग्णाचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.