परभणी - भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून जनसामान्य माणसाला विकासाचे केंद्रबिंदू मानले. विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून विकासाचे सेतू बांधण्याचा प्रामाणिक प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या विकासाच्या पर्वामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत देखील महाराष्ट्रात महायुतीचीच सत्ता पुन्हा प्रस्थापित होणार आहे, असा विश्वास राज्याचे मत्स्य व दुग्ध व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - काँग्रेसला धक्का.. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बुधवारी करणार भाजपमध्ये प्रवेश
परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे साई मैदानात संतश्री बालब्रह्मचारी डॉ.रामराव बापु यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जानकर बोलत होते. याच कार्यक्रमात जिंतूर-सेलू मतदारसंघातील साधू-संतांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर होते.
पुढे बोलतांना जानकर म्हणाले, महाराष्ट्रात महायुतीची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर बंजारा समाजाला एसटी संवर्गात समाविष्ट करून त्यांना विविध सवलती देवून मुख्य प्रवाहात आणण्यात येईल. जिंतूर मतदारसंघातील सर्व समाजाच्या समान विकासासाठी मेघना बोर्डीकरला विधानसभेत पाठवा, असे आवाहनही जानकरांनी केले.
हेही वाचा - वाण धरणाचे पाणी अकोल्यासाठी आरक्षित; अकोट, तेल्हारात कडकडीत बंद
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, माजी आमदार बोर्डीकर, खासदार संजय जाधव, पोहरादेवी संस्थान मुख्यपूजारी महंत बाबुसिंग महाराज आदींनी उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन केले. या सत्कार सोहळ्याला मतदारसंघातील बंजारा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पोहरादेवी संस्थानचे मुख्य पूजारी महंत बाबुसिंग महाराज, नेहरू महाराज, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, भाजप युवा नेत्या मेघना बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, सुरेश भुमरे, खासदार संजय जाधव, विठ्ठल रबदडे, संजय साडेगावकर, पुंजारे गुरुजी, विलास गीते, शिवाजीराव देशमुख, वसंत शिंदे, रवींद्र डासाळकर, उत्तम जाधव, सुरेश बनकर, राजेश वट्टमवार, सखाराम जाधव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.