ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्ये सूट: परभणीत प्रत्येक दुकांनासाठी विशिष्ट दिवस निश्चित; 'पाहा बाजारपेठेचे वेळापत्रक'

author img

By

Published : May 31, 2020, 8:07 PM IST

परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी सायंकाळी काढलेल्या आदेशात परभणी जिल्ह्यातील विविध दुकानांसाठी विशिष्ट दिवस अर्थात वारांची निश्चिती केली आहे.

parbhani
परभणीत प्रत्येक दुकांनासाठी विशिष्ट दिवस निश्चित

परभणी - कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये अखेर शासनाने शिथिलता दिली आहे. या अंतर्गत परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी सायंकाळी काढलेल्या आदेशात परभणी जिल्ह्यातील विविध दुकानांसाठी विशिष्ट दिवस अर्थात वारांची निश्चिती केली आहे.

त्यानुसार सोमवार, मंगळवार, बुधवार आणि त्यानंतर गुरूवार, शुक्रवार, शनिवार असे तीन-तीन दिवस बाजारपेठेतील कपडा, जनरल स्टोअर्स, इलेक्ट्रॉनिक, पुस्तके, क्रॉकरी आणि इतर दुकाने सुरू राहणार आहेत. तर पूर्वीप्रमाणेच अत्यावश्यक मेडिकल, किराणा, भाजीपाला, दूध आदींची दुकाने दररोज सुरू राहणार असल्याचेही जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हा महसुल प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 1 जूनपासून पुढील आदेशापर्यंत दुपारी 3 ते सकाळी 7 वाजेपर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे. या संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त कोणालाही फिरता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळता दुकाने व अस्थापने सुरू करण्यासंदर्भात दिवस, वेळ व वार निश्‍चीत केेला आहे. त्यानुसार सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत व्यवहार सुरू राहतील. या संदर्भात एक यादी प्रशासनाने माध्यमांना दिली आहे. त्याप्रमाणे बाजारपेठेतील विविध दुकानांचे व्यवहार सुरू ठेवण्यासाठी वार व वेळ पुढील प्रमाणे आहे.

वार: गुरूवार ते शनिवार; वेळ: सकाळी 7 ते दुपारी 3

सुरू राहणारी दुकाने:- इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, मोबाईल्स, टॉवर्स, बॅटरी, अ‍ॅटोमोबाईल्स, भांडी, स्टेशनरी, कटलरी, जनरल स्टोअर्स, प्लॉस्टीक- रस्सी, क्रॉकरी, गिफ्ट अर्टिकल, फर्निचर आदी.

वार: सोमवार ते बुधवार; वेळ: सकाळी 7 ते दुपारी 3

सुरू राहणारी दुकाने:- कपडा, रेडिमेड कपडे, टेलर्स, घडयाळ, सराफा, बेल्टींग, बॅक्स, सुटकेस, इमिटेशन ज्वेलरी, पुस्तक, सायकल, स्टील ट्रेडर्स, सिमेंट, स्क्रॉप मर्चंट, हार्डवेअर, बिल्डींग मटेरिअल, पेंट, फुटवेअर, प्लायवूड व उर्वरीत सर्व अस्थापना.

आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहणारे व्यवसाय

सुरू राहणारी दुकाने:- शेतीविषयक बि-बियाणे, औषधी, किराणा, खाद्य पदार्थ विक्री (स्वीटमार्ट, बेकरी, फास्ट फुड इतर) दुध विक्री, खासगी अस्थापना (सी.ए., विधिज्ञ कार्यालय इत्यादी), ऑप्टीकल, कापूस खरेदी.

रविवारसह सर्व दिवस सुरू असणाऱ्या सेवा

टीव्ही, फ्रिज, एसी आदी मेकॅनिक( फक्त घरी जावून दुरूस्त करणे) अन्य मशीन दुरूस्ती करणारे व सेवा देणारे कारागीर, सलून सेवा (फक्त घरी जावून)

आठवडाभर २४ तास सुरू राहणार्‍या सेवा

हॉस्पीटल, मेडिकल व आरोग्य विषयक सेवा. याप्रमाणेच आठवड्यातील रविवारसह सर्व दिवस 7 ते 3 या वेळेत लॉन्ड्री (हॉस्पीटलमधील कपड्यांसाठी व इतर), पेट्रोलपंप, वृत्तपत्र मुद्रण व विक्री, हायवेवरील ऑटोमोबाईल्स व गॅरेज तसेच अधिकृत सर्व्हिस सेंटरमधील वाहनांच्या व्यवहारासंबंधी कागदोपत्री कारवाई पूर्ण करण्याचे कामकाज या सेवा सुरू राहणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.