ETV Bharat / state

परभणीत दोन दिवसात 1848 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले; 27 रुग्णांचा मृत्यू - परभणी कोरोना अपडेट

परभणीत दोन दिवसात 1848 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात 27 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

परभणी
परभणी
author img

By

Published : Apr 26, 2021, 9:21 PM IST

परभणी - जिल्ह्यातील दिवसेंदिवस पसरत जाणाऱ्या कोरोना संसर्गामुळे बधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या व्यक्तींची संख्या देखील कमालीची वाढताना दिसून येत आहे. जिल्ह्यात रविवारी तब्बल 1172 तर सोमवारी 676 असे एकूण 1848 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासात नव्याने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 684 एवढी असून, 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत 813 बधितांचा मृत्यू -

शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असून सोमवारी 684 नवीन बाधित आढळले तर 27 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या जिल्हा रुग्णालयातील कक्षात 7 हजार 582 बाधित उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत 813 करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आजपर्यंत 32 हजार 100 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 24 हजार 705 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत 2 लाख 29 हजार 835 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 1 लाख 97 हजार 790 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले, तर 31 हजार 9 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले. 896 अनिर्णायक व 140 नमुने नाकारण्यात आले.

शासकीय रुग्णालयात सर्वाधिक मृत्यू -

गेल्या 24 तासात 27 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. यात 17 पुरुष तर 10 महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना रूग्णालयात 8, आयटीआय इमारतीमधील कोरोना रूग्णालयात 9 आणि जिल्हा परिषदेच्या कोरोना रूग्णालयामध्ये 3 असे एकूण तब्बल 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय चिरावू, लाईफ लाइन रूग्णालयामध्ये प्रत्येकी 2 तर पाडेला, स्वाती व देशमुख रूग्णालयामध्ये प्रत्येकी 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

परभणी जिल्ह्यात 333 बेड शिल्लक -

जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना रूग्णालयासह खासगी मंगल कार्यालय आणि इतर इमारतीमधून 30 कोरोना रूग्णालयसुरू आहेत. ज्यामध्ये 7 हजार 582 रुग्ण उपचार घेत आहेत. या सर्व 30 रुग्णालयांमध्ये 6 हजार 901 बेडची व्यवस्था करण्यात आली असून, त्यापैकी सध्य केवळ 333 बेड रिकामे आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक बेड रेणुका रूग्णालय येथे 137 बेड रिकामे असून, त्याखालोखाल जिल्हा रुग्णालयाच्या आयटीआय रूग्णालयमध्ये 33 बेड शिल्लक आहेत. याशिवाय जिल्हा रुग्णालयात 4, जिल्हा परिषद कोरोना रूग्णालय 28, भारत रूग्णालया, 22, स्वाती रूग्णालया, 4, डॉ.प्रफुल पाटील रूग्णालया 19, अक्षदा मंगल कार्यालय 28, सूर्या रूग्णालया 2 , सामाले रूग्णालय 3, ह्यात रूग्णालय 3, सुरवसे मॅटर्निटी 4, देहरक्षा रूग्णालय 20, स्पर्श रूग्णालय 11 तर गोकुळ रूग्णालयामध्ये 8 तर पार्वती हॉस्पिटलमध्ये 2 बेड शिल्लक आहेत. त्यामुळे नव्याने बाधित होणाऱ्या कोरोना रुग्णांनी बेड शिल्लक नसल्याच्या अफवांवर विश्वास न ठेवता या रुग्णालयांमध्ये संपर्क साधून उपचार घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. याशिवाय 5 हजार 78 रुग्ण घरून (होम आयसोलेशन) उपचार घेत आहेत.

1281 संशयितांची तपासणी -

दरम्यान, गेल्या 24 तासात जिल्ह्यात 1 हजार 281 संशयितांची 'आरटीपीसीआर' चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये मनपाच्या विविध केंद्रांवर 236 तर जिल्हा रुग्णालयात 166, पालम तालुका 273, पूर्णा 25, सोनपेठ 237, सेलू 280 तर जिंतूर ततालुक्यात 50 संशयितांच्या तपासण्या करण्यात आल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.