ETV Bharat / state

'वादळी वाऱ्यासह पाऊस आला अन् गहू, ज्वारीसाठी केलेला खर्च क्षणार्धात मातीत गेला'

गेल्या काही दिवसापासून तापमानात मोठी वाढ होत आहे. असे असले तरी दिवसा 35 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान राहणारे तापमान सायंकाळी दहा ते पंधरा अंशावर येऊ लागले आहे. त्यामुळे दिवसा उष्णता आणि रात्रीच्या वेळी थंडी, असे विचित्र वातावरण गेल्या काही दिवसात निर्माण झाले आहे. यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत होती. त्यातच आज (सोमवारी) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली.

heavy rainfall parbhani
परभणीत वादळी वाऱ्यासह पाऊस; गहू, ज्वारीसह भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान
author img

By

Published : Mar 9, 2020, 8:10 PM IST

Updated : Mar 9, 2020, 8:50 PM IST

परभणी - परभणी तालुक्यासह जिल्ह्यातील काही भागात आज सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास पावसाने जोरदार वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. यामध्ये गहू, ज्वारी या पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. शिवाय फुलोऱ्यात आलेल्या आंबा पिकाला देखील याचा मोठा फटका बसला आहे. या नुकसानीचे प्रशासनाने पंचनामा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.

'वादळी वाऱ्यासह पाऊस आला अन् गहू, ज्वारीसाठी केलेला खर्च क्षणार्धात मातीत गेला'

गेल्या काही दिवसापासून तापमानात मोठी वाढ होत आहे. असे असले तरी दिवसा 35 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान राहणारे तापमान सायंकाळी दहा ते पंधरा अंशावर येऊ लागले आहे. त्यामुळे दिवसा उष्णता आणि रात्रीच्या वेळी थंडी, असे विचित्र वातावरण गेल्या काही दिवसात निर्माण झाले आहे. यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत होती. त्यातच आज (सोमवारी) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास परभणी शहर तसेच तालुक्यातील खानापूर, कारेगाव, असोला, पांढरी, सिंगणापूर, बाभळी, जाम, बोरवंड, ब्राह्मणगाव आदी परिसरात वादळी वारे वाहिल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे जोरदार पावसाने हजेरी लावली. याशिवाय परभणी जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये देखील रिमझिम पाऊस पडला.

विशेष म्हणजे वादळी वाऱ्यामुळे गहू, ज्वारी आणि भाजीपाल्यासारखी पिके जमीनदोस्त झाली. तसेच फुलोऱ्यात आलेल्या आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात फुलोरा गळून पडल्याने त्याचा परिणाम आंब्यावर होणार आहे. तसेच ग्रामीण भागात वादळी वाऱ्यामुळे तात्पुरत्या स्वरुपातील घरे, झोपड्या यांचे देखील नुकसान झाल्याचे समजते.

दरम्यान, येत्या दिवसात मोठ्या प्रमाणात शासकीय सुट्या आहेत. त्यामुळे पंचनामे होतील की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी सुट्ट्या न घेता पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पंचनामे करण्यास उशीर झाल्यास याचा परिणाम शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवर होऊ शकतो. त्यामुळेच प्रशासनाने तत्काळ पंचनामे करण्याची तसदी घ्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Last Updated : Mar 9, 2020, 8:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.