ETV Bharat / state

परभणीतही परतीच्या पावसाचा तडाखा; होती ती पीकं गेलीच, रब्बीची पेरणीही खोळंबली - पालम तालुका पाऊस

परभणी जिल्ह्याला परतीचा पाऊस अक्षरशः झोडपून काढत आहे. यात सर्वाधिक परतीचा पाऊस पडलेल्या पालम तालुक्यात तर पिकांची अक्षरशः धूळधाण झाली आहे. खरिपाची पीके तर गेलीच आहेत; परंतु रब्बीची पेरणी देखील सततच्या पावसामुळे खोळंबली आहे. त्यामुळे प्रशासनाने आता नुकसान भरपाईसाठी अर्जाची प्रतिक्षा न करता, थेट बांधावर येऊन पंचनामे करावेत आणि तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Heavy Rain strikes Parbhani District as well damages all the crops
author img

By

Published : Oct 31, 2019, 9:15 AM IST

Updated : Oct 31, 2019, 12:09 PM IST

परभणी - जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. पावसाच्या जोरदार तडाख्यामुळे पिकांची अक्षरशः धूळधाण झाली आहे. तर, सततच्या पावसाने रब्बीची पेरणीही खोळंबली आहे. त्यामुळे प्रशासनाने आता नुकसान भरपाईसाठी अर्जाची प्रतिक्षा न करता, थेट बांधावर येऊन पंचनामे करावेत आणि तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

परभणीतही परतीच्या पावसाचा तडाखा; होती ती पीकं गेलीच, रब्बीची पेरणीही खोळंबली

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार सुरेश जाधव यांनी पालम प्रशासनाला निवेदन दिले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडे किंवा कुठेही निवेदन देण्यास सांगू नये, अशी मागणी केली आहे. तर, काही शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाल्यामुळे, शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करावी, आणि शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई, द्यावी अशी मागणीही केली आहे.

दरम्यान, परभणी जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यात केवळ सरासरीच्या 75 टक्के पाऊस झाला होता. परंतु, ऑक्‍टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून परतीचा पाऊस जिल्ह्याला झोडपून काढत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या 15 दिवसात तब्बल 300 टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्याची पावसाने सरासरी ओलांडली असून, काल सकाळीपर्यंत परभणी जिल्ह्यात 103 टक्के पाऊस झाला होता. काल दिवसभर देखील पावसाची रिमझिम अनेक ठिकाणी सुरू होती.

जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पालम तालुक्यात झाला आहे. पालम येथील पावसाची वार्षिक सरासरी 700 मिलिमीटर असून याठिकाणी केवळ या महिन्यात तब्बल 900 मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. कापूस, सोयाबीनचे पीक हातून गेले असून तुरीचा फुलोरा गळून पडला आहे. त्यामुळे खरिपाचे पीक हाती लागण्याची शक्यता दिसत नाही, तर प्रत्येक वर्षी दसरा ते दिवाळीच्या दरम्यान होणारी रब्बीची पेरणी देखील खोळंबली आहे. शेतात पाणी साचल्याने खरीपाचे पीक काढता येईना आणि पुढची रब्बीची पेरणी देखील करता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

एकूणच प्रशासनाने बांधावर येऊन पिकांची पाहणी करावी आणि शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. दरम्यान, परभणी जिल्ह्यातील पाथरी, जिंतूर या ठिकाणी देखील शेतकर्‍यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. ज्यामध्ये तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

हेही पहा : परतीच्या पावसाचा हाहाकार...

Intro:परभणी - परभणी जिल्ह्याला परतीचा पाऊस अक्षरशः झोडपून काढत आहे. यात सर्वाधिक परतीचा पाऊस पडलेल्या पालम तालुक्यात तर पिकांची अक्षरशः धूळधाण झाली आहे. खरिपाची पिके तर गेलीच; परंतु रब्बीची पेरणी देखील खोळंबली आहे. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी अर्ज करण्याच्या भानगडीत न टाकता बांधावर येऊन पंचनामे करावेत आणि तात्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Body: या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार सुरेश जाधव यांनी पालमच्या प्रशासनाला निवेदन दिले आहे. ज्यामध्ये विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना ज्या कर्जबाजारी करण्यासाठी सांगितल्या जात आहे, त्या भानगडीत शेतकऱ्यांना पाडू नये, शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करावी, कारण शंभर टक्के नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, परभणी जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यात केवळ सरासरीच्या 75 टक्के पाऊस झाला होता. परंतु ऑक्‍टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून परतीचा पाऊस जिल्ह्याला झोडपून काढत आहे. आक्टोंबर महिन्याच्या 15 दिवसात तब्बल 300 टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्याची पावसाची सरासरी ओलांडली असून, आज सकाळपर्यंत परभणी जिल्ह्यात 103 टक्के पाऊस झाला होता. आज दिवसभर देखील पावसाची रिमझिम अनेक ठिकाणी सुरू होती. यामध्ये सर्वाधिक पाऊस पालम तालुक्यात झाला आहे. पालम येथील पावसाची वार्षिक सरासरी 700 मिलिमीटर असून या ठिकाणी तब्बल 900 मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. ज्यामुळे संपूर्ण तालुक्यात खरिपाची पिके उध्वस्त झाली आहेत. शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचले असून, ज्यामध्ये पिकांना कोंब फुटले आहे. कापूस, सोयाबीनचे पीक हातून गेले असून, तुरीचा फुलोरा गळून पडला आहे. त्यामुळे खरिपाचे पीक हाती लागण्याची शक्यता दिसत नाही, तर प्रत्येक वर्षी दसरा ते दिवाळीच्या दरम्यान होणारी रब्बीची पेरणी देखील खोळंबली आहे. शेतात पाणी साचल्याने खरीपाचे पीक काढता येईना आणि पुढची रब्बीची पेरणी देखील करता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकूणच प्रशासनाने बांधावर येऊन पिकांची पाहणी करावी आणि शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. दरम्यान, परभणी जिल्ह्यातील पाथरी, जिंतूर या ठिकाणी देखील शेतकर्‍यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. ज्यामध्ये तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :-
pbn_palam_crop_damage_vis_farmer_1_to1_pkg_story

Conclusion:
Last Updated : Oct 31, 2019, 12:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.