ETV Bharat / state

सर तुम्ही सुद्धा! परभणी जिल्ह्यात मुख्याध्यापकाने शिक्षकाची पकडली गचांडी

महिन्यातील पंधरवाडा संपत असतानाही अद्याप आमचा पगार का झाला नाही? पगार लवकर करा, मला मुलाला दवाखान्यात न्यायचे आहे'. असे म्हणत पगाराबाबत विचारपूस केली. मात्र, यावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

author img

By

Published : Jul 21, 2019, 11:25 PM IST

सर तुम्ही सुद्धा! परभणी जिल्ह्यात मुख्याध्यापकाने शिक्षकाची पकडली गच्छंडी

परभणी - पवित्र शिक्षकी पेशाला न शोभणारे वर्तन जिंतूर तालुक्यातील मौजे भोसी येथे पहावयास मिळाले. या ठिकाणच्या मुख्याध्यापकाने एखाद्या मवाल्याप्रमाणे शिक्षकाची गचांडी (मान) पकडून धक्काबुक्की केल्याचा व्हिडीओ जिल्ह्यात जोरदार व्हायरल होत आहे. यामुळे शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जिंतूर तालुक्यातील भोसी या गावात जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे. इथे एकूण 9 शिक्षक आहेत. यापैकी मुख्याध्यापक एम.आर. सोन्नेकर यांच्याकडे शाळेतील शिक्षक गव्हाणे व रन्हेर यांनी शनिवारी 'महिन्यातील पंधरवाडा संपत असतानाही अद्याप आमचा पगार का झाला नाही? पगार लवकर करा, मला मुलाला दवाखान्यात न्यायचे आहे'. असे म्हणत पगाराबाबत विचारपूस केली. मात्र, यावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे राग अनावर झालेल्या मुख्याध्यापक सोन्नेकर यांनी शिक्षक रन्हेर यांची चक्क गचांडी (मान) पकडून उद्धट भाषेत त्यांच्याशी शाळेतच गैरवर्तन केले. 'जा कुणालाही सांग, असे म्हणत दमदाटी केल्याचा प्रकार एका व्हिडिओ क्लिपमध्ये इतर शिक्षकांनी कैद केला. ही क्लिप जिल्ह्यात सर्वत्र व्हायरल झाली आहे.

मुख्याध्यापक नेहमीच शिक्षकांशी गैरवर्तन आणि असभ्य भाषेचा वापर करत असल्याचा आरोप इतर शिक्षकांनी केली आहे. याबाबत अनेकवेळा शालेय व्यवस्थापन समितीने तालुका गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे कारवाईची मागणी केली होती. संबंधित गट शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापकाचा प्रताप पाहूनही आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नसल्याचा आरोप शिक्षक करत आहेत. पाच दिवसांपूर्वी शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी शाळेला भेट देऊन तक्रारीच्या संदर्भाने शिक्षकांकडून माहिती घेतली होती. त्यानंतरही या मुख्याध्यापकावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. शिक्षकांचेच असे असभ्य वर्तन असेल तर मुलांनी कुठले ज्ञान घ्यायचे, असा प्रश्न आता पालकांसमोर उभा राहिला आहे. या प्रकरणी जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी काय कारवाई करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:परभणी - पवित्र आशा शिक्षकी पेशाला न शोभणारे वर्तन परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असलेल्या मौजे भोसी येथे पहावयास मिळाले. या ठिकाणच्या मुख्याध्यापकाने एखाद्या मवाल्याप्रमाणे शिक्षकाची गच्छंडी (कॉलर) पकडून धक्काबुक्की केल्याचा व्हिडीओ जिल्ह्यात जोरदार व्हायरल होत असल्याने शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे.Body:जिंतूर तालुक्यातील भोसी या गावात जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एकूण 9 शिक्षकांची नियुक्ती आहे. यामध्ये शाळेची जबाबदार व्यक्ती असणारे मुख्याध्यापक एम.आर. सोन्नेकर यांच्याकडे शाळेतील शिक्षक गव्हाणे व रन्हेर यांनी काल शनिवारी 'महिन्याचा पंधरवाडा संपत असतानाही अद्याप आमचा पगार का झाला नाही, पगार लवकर करा, मला मुलाला दवाखान्यात न्यायचे आहे', असे म्हणत पगाराबाबत विचारपूस केली. मात्र या वरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे राग अनावर झालेल्या मुख्याध्यापक सोन्नेकर यांनी शिक्षक रन्हेर यांची चक्क गच्छंडी (शर्टाची कॉलर) पकडून उद्धट भाषेत त्यांच्याशी शाळेतील कार्यालयातच गैरवर्तन केले. तसेच 'जा कुणालाही सांग, असे म्हणत दमदाटी केल्याचा हा प्रकार एका व्हिडिओ क्लिपमध्ये इतर शिक्षकांनी कैद केला. आता ही क्लिप जिल्ह्यात व्हायरल झाली आहे.
दरम्यान, सदर मुख्याध्यापक नेहमीच शिक्षकांशी गैरवर्तन करीत व असभ्य भाषेचा वापर करीत असल्याचा आरोप इतर शिक्षक करतात. याबाबत अनेक वेळा शालेय व्यवस्थापन समितीने तालुका गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे कारवाईची मागणी केली होती. संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापकाचा प्रताप पाहूनही आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नसल्याचा आरोप शिक्षक करत आहेत. तर पाच दिवसांपूर्वी शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी शाळेला भेट देऊन तक्रारीच्या संदर्भाने शिक्षकांकडून माहिती घेतली होती. त्यानंतरही या मुख्याध्यापकावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान, शिक्षकांचेच असे असभ्य वर्तन असेल तर मुलांनी कुठले ज्ञान घ्यायचे, असा प्रश्न आता पालकांसमोर उभा राहिला आहे. या प्रकरणी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी काय कारवाई करतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- vis Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.