परभणी - जिंतूरच्या जवाहर कॉलनीत महावितरणच्या मोठ्या टॉवरजवळ असलेल्या या गोडाऊमध्ये पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला. या ठिकाणी सचिन कैलासआप्पा लकडे (35, रा. जवाहर कॉलनी) व शेख फैयाज आणि सदा आप्पा (दोन्ही रा. खैरी प्लॉट जिंतर) हे आरोपी सापडले. पोलिसांनी त्यांना अटक करून मोठ्या प्रमाणात पानमसाला आणि गुटखा जप्त केला.
यामध्ये विमल पान मसाला कंपनीचे 77 पाकीट, सुगंधीत जर्दा वाणी कंपनीचे 13 पाकीट, वजिर कंपनीचे 70 पाकीटाचे 7 नॉयलॉनचे पोते तसेच 103 पुडे एक नॉयलॉनच्या पोत्यामध्ये भरलेले आढळून आले. या शिवाय गोवा कंपनीच्या 52 व 86 पाकिटांचे दोन नॉयलॉनचे पोते, सितार कंपनीचे 63 पाकीट, राज निवास कंपनीचे 161 पाकिटे, पानपराग कंपनीचे 59 पाकीट, विमल पान मसाला कंपनीचे 38 पाकीट याशिवाय इतर विविध कंपनीचा पानमसला आणि गुटखा तर जर्दा कंपनीचे लोखंडी पत्र्याचे 5 डब्बे आणि मोबाईल असा एकूण 3 लाख 48 हजार 760 रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला.
ही कार्यवाही पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, राग सुधा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सपोनि एच. जी.पांचाळ, हनुमान कच्छवे, जगदिश रेड्डी, श्रीकांत घनसावंत, अतुल कांदे, पुजा भोरगे, वानोळे यांनी केली.