ETV Bharat / state

पाथरीत साडेचार लाख रुपयांचा गुटखा जप्त - parbhani police news

परभणी पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने पाथरीत साडेचार लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी त्यांनी 3 गुटखा माफियांना अटक केली आहे.

परभणी पोलीस अधिक्षक विशेष पथक
परभणी पोलीस अधिक्षक विशेष पथक
author img

By

Published : Dec 5, 2020, 4:25 PM IST

परभणी - पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने गुटखा माफियांवरील कारवाईचा धडाका सुरू केला आहे. याअंतर्गत मध्यरात्री पाथरी येथे कारवाई करून पथकाने तब्बल 4 लाख 60 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत 3 गुटका माफियांना अटक करण्यात आली आहे.

या संदर्भात विशेष पथकाचे फौजदार विश्वास खोले, चंद्रकांत पवार यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस कर्मचारी सुग्रीव केंद्रे, यशवंत वाघमारे, राहुल चिंचाने, शंकर गायकवाड, विष्णू भिसे, दीपक मुदिराज यांचे पथक तयार करून पाथरी शहरात छापा टाकला. शहरातील मुर्तुजा मोहल्ला भागात गुटखा माफिया नसीर उर्फ पप्पूभाई अन्सार यांच्या घरातून गुटखा जप्त केला. या कारवाईत एकूण 4 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे.

या प्रकरणी सुग्रीव केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाथरी पोलीस ठाण्यात नसीर उर्फ पप्पूभाई अन्सारी तसेच वाजेद मुन्ना अन्सारी, अवेज खान अलीदात खान पठान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास फौजदार अहिरे हे करीत आहेत.

वाळू, रेशन आणि गुटखा माफियांचे धाबे दणाणले-

दरम्यान, 2 महिण्यापूर्वीच रूजू झालेले पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी रेशन, गुटखा आणि वाळू माफियांसह अवैद्य धंदे चालकांवर कारवाईचा फास आवळला आहे. तसेच त्यांनी जिल्ह्यात चालणारे जुगार अड्डे आणि मटका बुकी चालकांवर देखील कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. त्यामुळे अवैद्य धंदे चालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

भ्रष्ट पोलिसांवरही कारवाई-

पोलीस अधीक्षक मीना हे अवैद्य धंदे चालक आणि विविध माफियांवर कारवाई करत आहेत. तसेच त्यांनी पोलीस खात्यांतर्गत भ्रष्टाचाराचा आरोप असणाऱ्या पोलिसांवर बडतर्फ तसेच निलंबनाची कारवाई देखील केली आहे. पोलीस अधीक्षक मीना यांनी रुजू झाल्याबरोबर त्यांनी जिंतूर, पाथरी तसेच सोनपेठ येथील भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली.

तर कालच त्यांनी पाथरी पोलीस ठाण्यात तक्रारदाराकडून जामिनासाठी लाच घेणाऱ्या एका कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. ज्यामुळे अवैद्य धंदे चालकांप्रमाणेच पोलीस खात्यात गैरव्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील त्यांची जरब निर्माण झाली आहे.

हेही वाचा- रवींद्र जडेजा संघातून 'आऊट', 'या' खेळाडूला संघात स्थान

हेही वाचा- कोरोना लस मोफत द्या! बिहार निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाचे काय झाले ?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.