ETV Bharat / state

बेवारस स्थितीत आढळले स्त्री जातीचे अर्भक, महिला दिनी परभणीतील प्रकार - परभणी

अर्भकाला कौसडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले गेले. डॉ. जाधव यांनी अर्भकाची तपासणी करून परभणीच्या जिल्हा रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अर्भक
author img

By

Published : Mar 9, 2019, 2:20 PM IST

परभणी - कालच जागतिक महिला दिन होऊन गेला. याच दिवशी जिंतूर तालुक्यातील कौसडी गावाजवळ स्त्री जातीचे अर्भक आढळून आले आहे. एका जनावराच्या गोठ्यात हे अर्भक आढळले. त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्याच्या आईचा तपास पोलीस करत आहेत.

कौसडी गावाजवळ असलेल्या गुळखंड फाटा येथे सिताबाई हरिभाऊ राऊत यांचा जनावराचा गोठा आहे. या गोठ्यात सिताबाईंना लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी गोठा तपासला असता त्यांना हे अर्भक दिसले. त्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांना याची माहिती दिली.

सिताबाईंचे शेजारी सय्यद आय्युब यांनी पोलीस पाटलांना याची सूचना दिली. त्यानंतर त्यांनी पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांना याची माहिती दिली. त्यानंतर अर्भकाला कौसडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले गेले. डॉ. जाधव यांनी अर्भकाची तपासणी करून परभणीच्या जिल्हा रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी बोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, मातेचा शोध सुरू आहे.

Intro:परभणी - जागतिक महिला दिनानिमित्त संपूर्ण जगात महिलांचा सन्मान होत असताना परभणी जिल्ह्यात मात्र एका निर्दयी मातेने आपले स्त्री जातीचे अर्भक सोडून पलायन केल्याची चीड आणणारी घटना घडली आहे. हा प्रकार जिंतूरच्या गुळखंड फाट्याजवळचा असून या प्रकरणी बोरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.Body:जिंतूर तालुक्यातील कौसडी गावाजवळ असलेल्या गुळखंड फाटा येथील सिताबाई हरिभाऊ राऊत यांच्या जनावराच्या गोठ्यात हे अर्भक सापडले. सिताबाईंना लहान मुलाच्या रडण्याच्या आवाज आल्याने त्यांनी घराच्या आजुबाजूची पहाणी केली. तेव्हा जनावराच्या गोठ्यात स्त्री-जातीचे अर्भक दिसून आले. त्यांच्या शेजारी रहाणारे गुळखंडचे माजी उपसरपंच सय्यद आय्युब सय्यद अली यांना त्यांनी या बाबतची माहिती सांगितल्यानंतर सय्यद अय्युब यांनी गुळखंडचे पोलीस पाटील शेख सलीम पटेल यांना फोनवर संपर्क साधून गुळखंड फाट्यावर बोलावून घेतले. त्यांनी बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांना या घटनेची माहीती दिली. त्यानंतर अर्भकाला कौसडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले गेले. डॉ.जाधव यांनी अर्भकाची तपासणी करून परभणीच्या जिल्हा रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पोलीस पाटील शेख सलीम पटेल व सहाय्यक पोलीस निरीक्षक आलेवार यांनी पोलिसांच्या गाडीतून परभणी जिल्हा रूग्णालयात अर्भकाला दाखल केले. या प्रकरणी बोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्या निर्दयी मातेचा सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. ए.बी. डोंगरे व त्यांचे पथक शोध घेत आहेत.
- गिरीराज भगत, परभणी
सोबत - फोटोConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.