ETV Bharat / state

धक्कादायक; पुण्यावरुन परभणीत परतलेल्या तरुणाला 'कोरोना'; रुग्णांची संख्या वाढली - कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ

परभणी जिल्ह्यात गेल्या 5 दिवसापासून अचानक कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी शहरातील साखळा प्लॉट भागात पुण्याहून परतलेल्या वीस वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे सकाळी प्राप्त झालेल्या अहवालातून निष्पन्न झाले आहे.

Parbhani
जिल्हा रुग्णालय
author img

By

Published : May 19, 2020, 10:22 AM IST

Updated : May 19, 2020, 6:23 PM IST

परभणी - सुरुवातीला ग्रीन झोनमध्ये राहणाऱ्या परभणी जिल्ह्यात गेल्या 5 दिवसापासून अचानक कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी शहरातील साखळा प्लॉट भागात पुण्याहून परतलेल्या वीस वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे सकाळी प्राप्त झालेल्या अहवालातून निष्पन्न झाले आहे. परभणीत सात रुग्णांची संख्या वाढून ७ वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण भाग सील करून निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश दिले आहेत.

परभणी शहरातील गंगाखेड रस्त्यावरील साखळा प्लॉट भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. हा तरुण पुण्यातील फातेमानगर भागातून 17 मे रोजी परभणीत परतला होता. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात आरोग्याची तक्रार घेवून तो दाखल झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचे स्वॅब घेवून नांदेड प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्यानुसार आज पहाटेच त्या स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला. त्यात तो तरुण पॉझिटिव्ह आढळला आहे. दरम्यान, या युवकाने पुण्यातून आपण एका वाहनावरून परभणीत आल्याचे म्हटले आहे. मात्र त्याच्यासोबत कोण होते, तो कोणाच्या संपर्कात आला, या बाबत त्याने अजूनपर्यंत काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे पोलीस व आरोग्य अधिकारी याची माहिती घेत आहेत.

साखळा प्लॉट भाग जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज सकाळी 7 वाजेपासून प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. त्यानुसार सदर भाग महापालिकेकडून निर्जंतुक करण्याचे काम सुरू झाले असून, हा भाग कोतवाली पोलिसांकडून सील करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Last Updated : May 19, 2020, 6:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.