मुंबई/परभणी- गंगाखेड तालुक्यातील माजी आमदार सीताराम घनदाट यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक, आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
परभणी जिल्ह्यात मागील विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने आपली पाळेमुळे मजबूत केली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या घनदाट यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीला जिल्ह्यात मोठे बळ मिळणार आहे. आज गंगाखेड मतदारसंघाचे माजी आमदार सीताराम घनदाट यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य परभणी व अभ्युदय बँकचे संचालक भरत घनदाट, माधव ठवरे, लालया पठाण, अमित घनदाट, गणेश काळे, गौतम हत्तीअंबिरे, मधुसूदन लापटे, चेअरमन जाधव, विनायक राठोड, दत्ताराव भोसले, दयानंद कदम, तुळशीराम शिंदे, विठ्ठल टोपे, डी. के. पाटील, विजयकुमार शिंदे, रावसाहेब शिंदे, शेखभाई चाऊस, शेख मुस्ताफा यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला चांगले काम करण्याची संधी मिळणार असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार सीताराम घनदाट यांनी पक्षप्रवेशानंतर दिली.
कोरोनाच्या आणि त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात झालेल्या प्रवेशाला प्रचंड मोठी गर्दी झाली होती. परभणी जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांची वाहने आणि त्यामुळे काही वेळ परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. गंगाखेड, मानवत, पालम आदी तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
माजी आमदार सीताराम घनदाट यांचा राष्ट्रवादीत प्रवेश - ajit pawar and ghandat
गंगाखेड मतदारसंघाचे माजी आमदार सीताराम घनदाट यांच्यासह जिल्हा परिषद सदस्यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. माजी आमदार घनदाट यांच्या पक्षप्रवेशामुळे परभणीत राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादामुळे घनदाट यांना आमदारकीचे तिकीट देण्यात आले नव्हते. मधुसुदन केंद्रे यांनी गंगाखेड मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
![माजी आमदार सीताराम घनदाट यांचा राष्ट्रवादीत प्रवेश Former MLA Sitaram Ghandat](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8819668-thumbnail-3x2-aa.jpg?imwidth=3840)