ETV Bharat / state

परभणी स्थानकात बसच्या केबिनला आग

बीड-किनवट बसने परभणी बस स्थानकात येताच पेट घेतला. अचानक लागलेल्या या आगीमुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट निर्माण झाली होती. ही घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. बस अद्याप कोणत्या कारणाने अचानक पेट घेतली याचे कारण स्पष्ट झालेले नाही.

author img

By

Published : May 28, 2019, 1:57 PM IST

आगीत जळालेले बोनेट

परभणी - बीड-किनवट बसने परभणी बस स्थानकात येताच पेट घेतला. अचानक लागलेल्या या आगीमुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट निर्माण झाली होती. ही घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. बस अद्याप कोणत्या कारणाने अचानक पेट घेतली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, प्रसंगावधान राखून प्रवाशी बसच्या बाहेर पडल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीत बसचा समोरचा भाग जळून खाक झाला आहे.

बीड येथून किनवटकडे जाणारी एसटी बस परभणी बस स्थानकात आल्यानंतर वाहक शेजारी असलेल्या बोनेटने अचानक पेट घेतला आणि आग कॅबिनमध्ये पसरली. तेव्हा एसटी महामंडळाच्या अधिकारी आणि प्रवाशांनी आग विझवण्याच्या साहित्याचा वापर करत आग नियंत्रणात आणली. दरम्यान, अग्निशामक दलाला पाचारण करण्याने आले होते. मात्र, अग्निशामक दल घटनास्थळी पोहचेपर्यत आग नियंत्रणात आली होती. या घटनेमध्ये वेळीच प्रसंगावधान राखत प्रवासी बसमधून उतरले होते.

दरम्यान, ही आग कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. केबिनमध्ये कदाचित शॉर्टसर्किट झाले असावे आणि त्यातून ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. तरी देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याची चौकशी केली जाईल, अशी माहिती एसटी विभागाने दिली आहे.

Intro:परभणी - परभणीच्या बस स्थानकात येताच बीड-किनवट बसने पेट घेतला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट निर्माण झाली होती. ही घटना 9 वाजता घडली अजूनही कारण स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, प्रसंगावधान राखून प्रवाशी बसच्या बाहेर पडल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र आगीत बसचा समोरचा भाग जळून खाक झाला आहे.Body:बीड येथून किनवट कडे जाणारी ही एसटी बस परभणी बस स्थानकात आल्यानंतर ड्रायव्हर शेजारी असलेल्या बोनेटने अचानक पेट घेतला. त्यात कॅबिन मध्ये आगी पसरली. यामुळे एसटी महामंडळाचे कर्मचारी, अधिकारी आणि प्रवाश्यानी तेथून धाव घेतली, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, एसटी महामंडळाच्या प्रवासी आणि अधिकाऱ्यांनी वेळीच दक्षता घेत आग विझवण्याच्या यंत्राने ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे काही मिनिटातच आग नियंत्रित करण्यात आली. शिवाय अग्निशामक दल आणि पोलिस खबर मिळताच धावून आले होते. दरम्यान, ही आग कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. केबिनमध्ये कदाचित शॉर्टसर्किट झाले असावे आणि त्यातून ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तरी देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याची चौकशी केल्या जाईल, असे एसटी विभागाने सांगितले आहे.
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- visConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.