ETV Bharat / state

परभणीत पावसाची दडी, पेरण्या खोळंबल्या; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे - less rain

पाऊस आला नाही तर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पेरण्याच केल्या नाहीत, त्यांची नजर आकाशाकडे लागली आहे.

शेतकऱ्यांची नजर आभाळाकडे
author img

By

Published : Jul 4, 2019, 1:08 PM IST

परभणी - जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. गेल्या २४ जूनला पावसाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर आठ दिवस रोज बरसणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली. परंतु आता पाऊस थांबल्याने पेरण्या कराव्यात की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नजर आता आकाशाकडे लागली आहे.

परभणीत पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या

परभणी जिल्ह्यात पावसाची सरासरी ७७४.२ मिमी एवढी आहे. परंतु गेल्या काही वर्षांत परभणी जिल्ह्यात सरासरीच्या ५० ते ६५ टक्के एवढा पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांना कायम दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यावर्षीदेखील मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली होती. परंतु २४ जून रोजी सुरू झालेला पाऊस पुढे ६ दिवस रिमझीम बरसला. २४ ते २९ जूनदरम्यान परभणी जिल्ह्यात ६१.७५ मिलिमीटर एवढा पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीयोग्य वातावरण मिळाले; परंतु, त्यानंतर दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत असतानाच गेल्या चार दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे.

एक जुलै रोजी केवळ १२.५ मिमी पावसाचा अपवाद वगळता चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे वातावरणातील उष्णता वाढली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्यांना दुबार पेरणीची भीती वाटत आहे, तर अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पेरण्याच केल्या नाहीत. गेल्या काही वर्षांत अनुभव पाहता शेतकरी दमदार पाऊस पडल्याशिवाय पेरणी करत नाहीत, असे चित्र आहे.

यावर्षीदेखील शेतकऱ्यांनी मागचा अनुभवावरून पेरणीसाठी 'वेट अँड वॉच' ची भूमिका घेतली आहे. याचा परिणाम व्यापारावर झाला आहे. परभणी शहरातील नवा मोंढा भागात खरेदीसाठी शेतकरी येत नसल्याचे दिसून येत आहे. व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसून आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्याचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. अजून काही दिवस अशीच परिस्थिती राहिली तर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

Intro:परभणी - परभणी जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने खंड दिला आहे. जिल्ह्यात 24 जूनला पावसाला सुरुवात झाली होती, त्यानंतर आठ दिवस रोज बरसणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली होती ; परंतु आता पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांपुढे पेरण्या कराव्यात की नाही ? असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नजर आता आभाळाकडे लागली आहे.
Body:परभणी जिल्ह्याची पावसाची सरासरी 774.2 मिमी एवढी आहे ; परंतु गेल्या काही वर्षात परभणी जिल्ह्यात सरासरीच्या 50 ते 65 टक्के एवढा पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कायम दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. यावर्षी देखील मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली होती ; परंतु 24 जून रोजी सुरू झालेला पाऊस पुढे सहा दिवस रिमझिम का होईना, पण बरसत गेला. 24 ते 29 जून दरम्यान परभणी जिल्ह्यात 61.75 मिलिमीटर एवढा पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीयोग्य वातावरण मिळाले ; परंतु त्यानंतर दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत असतानाच गेल्या चार दिवसात पावसाने दडी मारली. 1 जुलै रोजीचा सरासरी केवळ 12.5 मिमी पावसाचा अपवाद वगळता चार दिवसात पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे वातावरणातील उष्णता वाढली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्यांना आता उगवण्याची भीती वाटत आहे, तर अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पेरण्याच केल्या नाहीत. गेल्या काही वर्षात अनुभव पाहता शेतकरी दमदार पाऊस पडल्याशिवाय पेरत नाहीत, असे चित्र आहे. यावर्षी देखील शेतकऱ्यांनी मागचा अनुभवावरून पेरणीसाठी 'वेट अँड वॉच' ची भूमिका घेतली आहे. याचा परिणाम व्यापारावर झाला आहे. परभणी शहरातील नवा मोंढा भागात खरेदीसाठी शेतकरी येत नसल्याचे दिसून येते. व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसून आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्याचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. अजून काही दिवस अशीच परिस्थिती राहिली तर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- vis with vo.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.