ETV Bharat / state

वीज कोसळून २ मेंढपाळांसह ४० शेळ्या ठार; परभणीमधील आंधपुरीतील दुर्घटना - pathari

आंधपुरीचे सरपंच चंद्रकांत सखाराम मोरे यांच्या शेतात ते सोमवारी रात्री शेळ्यासह झाडाखाली थांबले होते. दरम्यान रात्री जोरदार वादळी वारे आणि विजांचा कडकडाट झाला.

वीज कोसळून २ मेंढपालांसह ४० शेळ्या ठार
author img

By

Published : Apr 16, 2019, 2:48 PM IST

परभणी - जिल्ह्यातील पाथरी तालुक्याच्या अंधापुरी येथे झाडाखाली थांबलेल्या दोन मेंढपाळांसह ४० शेळ्यांवर वीज कोसळल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच अन्य एक मेंढपाळ गंभीररित्या भाजला आहे. त्याची प्रकृती नाजूक आहे. या प्रमाणेच लोणी बु. येथे वीज पडून एक बैल दगावला आहे.

वीज कोसळून २ मेंढपालांसह ४० शेळ्या ठार

बीड जिल्ह्यातील सुनवाडी (ता. धारूर) येथील मेंढपालक रामभाऊ साधू शिंदे (वय ५०), बालू सिताराम काळे (वय ४०), कृष्णा रामभाऊ शिंदे (वय १८) हे गेली दीड महिन्यापासून अंधापुरी गावात शेळ्या घेऊन राहात आहेत. आंधपुरीचे सरपंच चंद्रकांत सखाराम मोरे यांच्या शेतात ते सोमवारी रात्री शेळ्यासह झाडाखाली थांबले होते. दरम्यान रात्री जोरदार वादळी वारे आणि विजांचा कडकडाट झाला.

यावेळी एक वीज मेंढपाळ थांबलेल्या झाडावर पडली. यात ४० शेळ्यासह बालू सिताराम काळे आणि कृष्णा रामभाऊ शिंदे या दोघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर रामभाऊ साधू शिंदे हे गंभीरीत्या भाजले आहेत. हे ठिकाण गावच्या पुर्व दिशेला एक दीड किमी अंतरावर असून याविषयी भाजलेल्या रामभाऊ शिंदे यांनी सरपंच चंद्रकांत मोरे आणि पोलीस पाटील लक्ष्मणराव एखंडे यांना माहिती दिल्यानंतर गावातील गणेश कोल्हे, बळीराम मोरे अशोक महाडीक यांच्यासह दहा ते पंधरा जणांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पाथरी पोलिसांना माहिती देऊन जखमी रामभाऊ यांना उपचारासाठी अंबेजोगाई येथे दवाखाण्यात हलविण्यात आले. जखमी रामभाऊ यांच्या हाता-पायासह कंबरेला भाजले असल्याचे गणेश कोल्हे यांनी सांगितले. तर मृतांचा रात्री उशिरा पोलीस पंचनामा करून पुढील तपासणी पाथरीच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. या घटनेत १७ शेळ्या बचावल्या असून, त्यात ६ शेळ्या जखमी असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. दरम्यान, लोणी बु. येथील मारोती कारभारी धर्मे यांच्या शेतात वीज पडल्याने बैलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी तलाठी, मंडळ अधिकारी आणि नायब तहसिलदार यांच्या पथकाने अंधापुरी येथे आज मंगळवारी जाऊन पंचनामा केला आहे.

Intro:परभणी - जिल्ह्यातील पाथरी तालुक्याच्या अंधापुरी येथे झाडाखाली थांबलेल्या दोन मेंढपालांसह 40 शेळ्यांवर वीज कोसळल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच अन्य एक मेंढपाळ गंभीर भाजला असून त्याची प्रकृती नाजूक आहे. या प्रमाणेच लोणी बु. येथे विज पडून एक बैल दगावला आहे.Body:बीड जिल्ह्यातील सुनवाडी (ता धारूर) येथील मेंढपालक रामभाऊ साधू शिंदे (वय 50), बालू सिताराम काळे (वय ४०), कृष्णा रामभाऊ शिंदे (वय १८) हे गेली दिड महिण्यापासून अंधापुरी गावात शेळ्या घेऊन राहात आहेत. आंधपुरी गावचे सरपंच चंद्रकांत सखाराम मोरे यांच्या शेतात ते सोमवारी रात्री शेळ्यासह झाडा खाली थांबले होते. दरम्यान रात्री जोरदार वादळी वारे आणि विजांचा कडकडाट झाला. याच वेळी एक विज मेंढपाळ थांबलेल्या झाडावर पडली. यात ४० शेळ्या सह बालू सिताराम काळे आणि कृष्णा रामभाऊ शिंदे या दोघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर रामभाऊ साधू शिंदे हे गंभीरीत्या भाजले आहेत. हे ठिकाण गावच्या पुर्व दिशेला एक दिड किमी अंतरावर असून या विषयी भाजलेल्या रामभाऊ शिंदे यांनी सरपंच चंद्रकांत मोरे आणि पोलीस पाटील लक्ष्मणराव एखंडे यांना माहिती दिल्यानंतर गावातील गणेश कोल्हे, बळीराम मोरे अशोक महाडीक यांच्या सह दहा ते पंधरा जनांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पाथरी पोलीसांना खबर देऊन जखमी रामभाऊ यांना उपचारासाठी अंबेजोगाई येथे दवाखाण्यात हलविण्यात आले. जखमी रामभाऊ यांच्या हाता-पायासह कंबरेला भाजले असल्याचे गणेश कोल्हे यांनी सांगितले. तर मृतांचा रात्री उशिरा पोलीस पंचनामा करून उत्तरीय तपासनी पाथरी ग्रामिण रुग्नालयात करण्यात आली. या घटनेत सतरा शेळ्या बचावल्या असून, त्यात पाच सहा जखमी असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
याच दरम्यान, लोणी बु. येथील मारोती कारभारी धर्मे यांच्या शेतात विज पडल्याने बैलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी तलाठी, मंडळ अधिकारी आणि नायब तहसिलदार यांच्या पथकाने अंधापुरी येथे आज मंगळवारी जाऊन पंचनामा केला आहे.
- गिरीराज भगत, परभणी
- सोबत visConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.