ETV Bharat / state

Elderly Couple Murder Parbhani : परभणीत वृद्ध दाम्पत्याचा निर्घृण खून; मेहुणीसोबत तरुण आला होता मुक्कामी! - परभणीत वृद्ध दाम्पत्याचा निर्घृण खून

परभणी तालुक्यातील असोला गावात एका वृद्ध दाम्पत्याचा अज्ञात व्यक्तींनी निर्घृण खून ( Elderly Couple Murder Parbhani ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वृद्ध दाम्पत्याचा खून ( Parbhani double murder ) झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Elderly couple murder in parbhani
ताडकळस पोलीस स्टेशन
author img

By

Published : Mar 16, 2022, 5:23 PM IST

Updated : Mar 16, 2022, 6:43 PM IST

परभणी - तालुक्यातील असोला गावात एका वृद्ध दाम्पत्याचा अज्ञात व्यक्तींनी निर्घृण खून ( Parbhani double murder ) केल्याची धक्कादायक घटना घडली ( Elderly Couple Murder Parbhani ) आहे. यामध्ये अन्य एक महिला गंभीर जखमी झाली असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. वृद्ध दाम्पत्याचा खून झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मेहुणीसोबत अज्ञात तरुण होता मुक्कामी -

शंकरराव ग्‍यानोजी रिक्षे (वय 70) व सारजाबाई शंकरराव रिक्षे (वय 65) असे खून झालेल्या वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे. ते दोघे काल मंगळवारी रात्री जेवण करून घरात झोपले होते. त्यांच्या समवेत त्यांची मेहुणी गिरजाबाई गोविंद आडकिने याही मुक्कामी होत्या. तर आडकिने यांच्यासोबत एक अज्ञात तरुण मुक्कामी आला होता. दरम्यान, बुधवारी सकाळी शेजारील व्यक्तींनी घराचे दार लोटून पाहिले. तेव्हा शंकरराव व सारजाबाई रिक्षे हे दोघे रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. तर गिरजाबाई आडकिने या गंभीर अवस्थेत बाजूला दिसून आल्या. गिरजाबाई आडकिने यांना गावकऱ्यांनी परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना तिथून नांदेड येथे हलविण्याचा सल्ला दिल्याने त्यांची रवानगी नांदेडला करण्यात आली आहे.

श्वानपथक, आरोपींच्या ठसे तपासणीचे काम सुरू -

ग्रामस्थांनी याबाबत तातडीने ताडकळस पोलिसांना माहिती कळवली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड यांच्यासह अन्य कर्मचारी घटनास्थळी धावून आले. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथकास पाचारण करून आरोपींच्या ठसे तपासणीचे काम सुरू केले आहे. या घटनेने असोला गावात मोठी खळबळ उडाली आहे. दुपारी उशिरापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी कोणताही खुलासा केला नव्हता.

अज्ञात व्यक्तीच्या ओळखीनंतरच खुनाचा उलगडा होणार -

या वृद्ध दाम्पत्याच्या मेव्हणीसोबत आलेल्या अज्ञात व्यक्तीची ओळख पडट्यानंतरच या खुनाचा उलगडा होणार आहे. या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परंतु, महिला गंभीर जखमी असल्याने तिचा जबाब घेण्यात आला नाही. तिच्या जबाबानंतर या घटनेत स्पष्टता येणार आहे. मात्र, अद्याप पोलिसांनी याबाबत कुठलीही माहिती दिलेली नाही.

हेही वाचा - Maharashtra Holi Guidelines : होळी, धुळवडीसाठी राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर; जाणून घ्या नियम व अटी

Last Updated : Mar 16, 2022, 6:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.