ETV Bharat / state

'सायकल-डे' विशेष : परभणीच्या डॉक्टरची 70 हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करून 'एड्स' जनजागृती

author img

By

Published : Jun 2, 2021, 10:59 PM IST

Updated : Jun 3, 2021, 12:29 PM IST

डॉ. पवन चांडक यांच्या सायकलिंगची प्रेरणा परभणीतील युवकांनीच नव्हे तर राज्यातील आणि देशातील काही युवकांनी देखील घेतली आहे. विशेष म्हणजे सायकलींच्या माध्यमातून ते जी जनजागृती करत आहेत. ती प्रेरणादायी आहे. त्यांच्या या मोहिमेत परभणीतील अनेक युवक प्रत्येक वेळी सहभागी होत असतात. या जनजागृतीसाठी ते दरवर्षी अनेक मोठ्या शहरांना सायकलवरून सहकाऱ्यांसोबत भेट देत असतात.

parbhani world cycle day strory
परभणीच्या डॉक्टरची 70 हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करून 'एड्स' जनजागृती

परभणी - तंत्रज्ञानाच्या या युगात काही तासात हजारो किलोमीटरचा पल्ला गाठणाऱ्या विमानांचा शोध लागला. सोबतच रस्त्यावरून शेकडो किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या वाहनांचा देखील अविष्कार झाला. मात्र, या वेगवान तंत्रज्ञानाच्या दुनियेत आजही सायकलचे महत्त्व कायम आहे. निसर्गपूरक आणि शारीरिक व्यायामाच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या सायकलिंगकडे आता पॅशन म्हणूनही पाहिल्या जात आहे. असाच छंद जोपासणारे परभणीतील सायकलपटू डॉ. पवन चांडक यांनी गेल्या काही वर्षात देश-विदेशात तब्बल 70 हजारो किलोमीटरचा सायकल प्रवास केला आहे. जागतिक सायकल दिनानिमित्त त्यांच्याशी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने केलेली खास बातचीत...

परभणीच्या डॉक्टरची सायकल प्रवास करून 'एड्स' जनजागृती

कोण आहेत डॉ. पवन चांडक ?

व्यवसायाने होमिओपॅथिक डॉक्टर असलेले पवन चांडक आपल्या पत्नीसह परभणीत क्लिनिक चालवतात. 2013साली त्यांना डॉ. बाबा आमटे यांच्या एका कार्यक्रमातून एड्सग्रस्त अनाथ बालकांसाठी जनजागृती करण्याची प्रेरणा मिळाली. या जनजागृतीसाठी त्यांनी सायकलीचे माध्यम निवडले. पुढे हिच सायकलिंग त्यांचा छंद बनली. या माध्यमातून त्यांनी एड्सबाबत जनजागृती करत भारतातील तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश आदी 5 राज्यात सायकल प्रवास केला. याशिवाय परदेशातील इंग्लंड, स्कॉटलंड, जर्मनी आणि फ्रान्स या 4 देशात देखील जागतिक शांतता नांदावी म्हणून जनजागृती करत सायकल प्रवास केला.

'सायकल-टू-वर्क' चळवळ व्हायला पाहिजे - डॉ. पवन चांडक

'सुरुवातीला भारतात मोठ्या प्रमाणात सायकलचा वापर होत होता. मात्र, कालांतराने मोटर सायकलचा आविष्कार झाल्याने सायकल मागे पडू लागली. मात्र, सध्या सायकलचे महत्त्व ओळखून परदेशात तिचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक अनेक मोठ्या कंपन्या सायकलने कार्यालयात येण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत. 'सायकल-टू-वर्क' ही चळवळ भारतात देखील व्हायला हवी. तसेच आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व असलेली सायकल इंधनाची मोठी बचत करते. त्यामुळे ही चळवळ झाल्यास भारतातील लोकांचे आरोग्य सुधारून मोठ्या प्रमाणात इंधन बचत होईल, असे डॉ. पवन चांडक म्हणाले.

अनेक तरुणांनी घेतली प्रेरणा

डॉ. पवन चांडक यांच्या सायकलिंगची प्रेरणा परभणीतील युवकांनीच नव्हे तर राज्यातील आणि देशातील काही युवकांनी देखील घेतली आहे. विशेष म्हणजे सायकलींच्या माध्यमातून ते जी जनजागृती करत आहेत. ती प्रेरणादायी आहे. त्यांच्या या मोहिमेत परभणीतील अनेक युवक प्रत्येक वेळी सहभागी होत असतात. या जनजागृतीसाठी ते दरवर्षी अनेक मोठ्या शहरांना सायकलवरून सहकाऱ्यांसोबत भेट देत असतात.

हेही वाचा - विशेष बातमी : सायकलस्वारांची ज्येष्ठांना मदत,3858 किलोमीटर सायकल चालवत पोहोचवले औषधे आणि अन्न

Last Updated : Jun 3, 2021, 12:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.