ETV Bharat / state

पाथरीच साईंची जन्मभूमी..? सेलूतून पाथरीकडे निघाली हजारो भाविकांची दिंडी - परभणी जिल्हा बातमी

पाथरीकरांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सेलू ते पाथरी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सेलू येथील साईबाबांचे गुरु बाबासाहेब महाराज यांच्या मंदिर संस्थांच्या वतीने आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली सेलू येथून आज पायी दिंडीला सुरुवात झाली.

Dindi from Selu to Pathari
सेलूतून पाथरीकडे निघाली हजारो भाविकांची दिंडी
author img

By

Published : Feb 9, 2020, 11:55 AM IST

परभणी - जिल्ह्यातील पाथरी हीच श्री साईबाबांची जन्मभूमी असून यासाठी पाथरीकरांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सेलू ते पाथरी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीला आज सुरुवात झाली. 24 किलोमीटरच्या या पायी दिंडीत आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

सेलूतून पाथरीकडे निघाली हजारो भाविकांची दिंडी

हेही वाचा - बँक फोडणाऱ्या चार आरोपींना अटक; परभणी स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

साईबाबा यांची जन्मभूमी पाथरीच आहे. त्यासाठी आम्हाला कोणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे म्हणत परभणी जिल्ह्यातील साईभक्तांनी पाथरी जन्मभूमीच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत सेलू येथील साईबाबांचे गुरु बाबासाहेब महाराज यांच्या मंदिर संस्थांच्या वतीने आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली सेलू येथून आज पायी दिंडीला सुरुवात झाली. सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. स्वतः आमदार मेघना बोर्डीकर, सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे, जिल्हा परिषद सदस्य अशोक काकडे यांच्यासह सर्वपक्षीय नेते या दिंडीत मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

दरम्यान, या दिंडीत पायी चालत असताना आमदार मेघना बोर्डीकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, साईबाबा यांच्या जन्मस्थळाला शिर्डीकरांचा विरोध होत आहे. त्यामुळे पाथरी हीच साईबाबांचे जन्मस्थळ असल्याच्या समर्थनार्थ ही दिंडी आयोजित केली आहे. साईबाबा यांच्या जन्मस्थळासाठी आम्हाला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. साईबाबांची जन्मभूमी पाथरीच आहे आणि त्यांचे गुरु सेलू येथील बाबासाहेब महाराजच आहेत. त्यामुळे आम्ही साईबाबांचे भक्त म्हणून या दिंडीचे आयोजन केले आहे आणि यापुढे प्रत्येक तालुक्यातून अशा महादिंडी काढण्यात येतील, असे बोर्डीकर यांनी सांगितले.

हेही वाचा - विद्यार्थ्यांनी अडवला फडणवीसांचा ताफा; प्रश्न स्वतः सभागृहात मांडण्याची दिली ग्वाही

Intro:परभणी - पाथरीतील साईबाबांच्या जन्मस्थळ समर्थनार्थ साईबाबांचे गुरू बाबासाहेब महाराज यांच्या सेलूतून प्रचंड मोठ्या महादिंडीला सकाळी आठ वाजता प्रस्थान झाले आहे. ही दिंडी साईभक्तांच्या गर्दीने फुलून गेली आहे. 24 किलोमीटरच्या या पायी दिंडीत आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.Body:पाथरी येथील साईजन्म स्थळावरून शिर्डीकरांनी वाद निर्माण केला आहे. साई जन्मस्थळ मंदिर आणि पााथरी शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शंभर कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्यानंतर या वादाला तोंड फुटले होते. या नंतर पाथर्डी मोठा उठाव झाला. त्यानंतर या ठिकाणच्या आमदार बाबजानी दुराणी आणि जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार घेऊन महाआरती केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; परंतु मुख्यमंत्र्यांनी यावर पडदा टाकण्याचा सूचना केल्या. परंतु साईबाबा यांची जन्मभूमी पाथरीच आहे, आणि त्यासाठी आम्हाला कोणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे म्हणत परभणी जिल्ह्यातील साईभक्तांनी पाथरी जन्मभूमीच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत सेलू येथील साईबाबांचे गुरु बाबासाहेब महाराज यांच्या मंदिर संस्थांच्या वतीने आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली आज सेलू येथून प्रचंड मोठ्या महादिंडीला सुरुवात झाली आहे. 24 किलोमीटरच्या या पायी दिंडीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. स्वतः आमदार मेघना बोर्डीकर, सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे, जिल्हा परिषद सदस्य अशोक काकडे यांच्यासह सर्वपक्षीय नेते या दिंडीत मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. दरम्यान या दिंडीत पायी चालत असताना आमदार मेघना बोर्डीकर यांनी माध्यमांशी संवाद साधला त्या म्हणाल्या, साईबाबा यांच्या जन्मस्थळ वरून शिर्डीकरांचा विरोध होत आहे. त्यामुळे आम्ही समर्थनार्थ ही महादिंडी आयोजित केली आहे. साईबाबा यांच्या जन्मस्थळासाठी आम्हाला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, साईबाबांची जन्मभूमी पाथरीच आहे आणि त्यांचे गुरु सेलू येथील बाबासाहेब महाराजांचे आहेत. त्यामुळे आम्ही साईबाबांचे भक्त म्हणून या महा दिंडीचे आयोजन केलेे. आणि यापुढे प्रत्येक तालुक्यातून अशा महादिंडी काढण्यात येतील, असेही म्हणाल्या.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- pbn_mla_meghna_bordikar_byte
& selu-pathri_madindi_visConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.