ETV Bharat / state

पीक विम्याचे अपयश लपवण्यासाठी सरकार लोकांची दिशाभूल करते - देवेंद्र फडणवीस - परभणी जिल्हा बातमी

महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या मृत्यूंची संख्या लपवण्यात आली आहे. त्यामुळेही मृत्यूंची खरी संख्या पुढे आली पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jun 2, 2021, 3:37 PM IST

Updated : Jun 2, 2021, 4:39 PM IST

परभणी - 'महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पीक विम्याबाबत विमा कंपन्या आणि केंद्र सरकारच्या विरोधात बोलण्याऐवजी पीक विम्याचे निविदा योग्य प्रकारे कसे निघेल, त्याच्या अटी-शर्ती योग्य कशा असतील, हे पाहणे आवश्यक होते. उलट आमच्या 2015 ते 19 च्या काळात 576 कोटी रुपये ज्यावर्षी शेतकऱ्यांनी भरले, त्यावर्षी आम्ही शेतकऱ्यांना 4 हजार कोटी रुपयांचा लाभ मिळवून दिला. मग आता ते का मिळत नाहीत, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच 'आपले अपयश लपवायचे आणि लोकांना खोटे सांगून त्यांची दिशाभूल करायचे काम राज्य सरकार करत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.

बोलताना फडणवीस

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवारी) परभणी शहरातील जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीत असलेल्या कोविड सेंटरला भेट दिली. यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना परिस्थितीचा आणि खरीप हंगामाचा देखील आढावा घेतला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार मेघना बोर्डीकर, शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, सुरेश भुमरे आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

परभणीत तिसऱ्याला लाटेचीही तयारी; समाधानाची बाब

परभणीत 40 हजाराहून अधिक रुग्ण या लाटेत आढळले आहेत. तसेच या ठिकाणचा मृत्यूदरही जास्त असल्याने ती एक चिंतेची बाब आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने तिसऱ्या लाटेची तयारी होत असल्याचे सांगितले. ही समाधानाची बाब आहे. मात्र, मी म्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याची सूचना जिल्हा प्रशासनाला केली आहे. या संदर्भात योग्य काळजी घेतल्यास मोठ्या प्रमाणात मृत्यूदर थांबवता येतील, असेही फडणवीस म्हणाले.

खासगी रुग्णालयांचे ऑडिट शासनाला करावेच लागणार

दरम्यान, राज्य शासनाने कोरोना संदर्भातील उपचारांच्या दरांबाबत काल (दि. 1 जून) घोषणा केली. मात्र, 50 लाखांहून अधिक रुग्ण झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आल्याने खूप उशीर झाला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत शहरी तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना लाखो रुपयांची बिले भरावी लागली. पण, उशिरा का होईना पण ही घोषणा केल्याने ही एक समाधानाची बाब आहे. तसेच खासगी रुग्णालयांनी यापूर्वी रुग्णांकडून जी बिले आकारली त्याचे ऑडिट शासनाला करावेच लागणार आहे. कारण न्यायालयाने या संदर्भातील विशेष आदेश दिले आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

पीएम केअरमध्ये मिळालेले व्हेंटिलेटर व्यवस्थित सुरू आहेत

परभणीत पीएम केअर मधून मिळालेले सर्व व्हेंटिलेटर व्यवस्थित सुरू आहेत, असे प्रशासनाने मला सांगितले आहे. औरंगाबाद येथे एका कंपनीचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता. मात्र, परभणीत कुठलीही समस्या नाही किंबहुना या व्हेंटिलेटरवरच सर्व काम चालत असल्याचे प्रशासनाने सांगितल्याचे फडणीस म्हणाले. विशेष म्हणजे यासंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी परभणी जिल्ह्यात कोविड सेंटरची पाहणी करून पीएम केअरमधून मिळालेले व्हेंटिलेटर नादुरुस्त असून, ते उपयोगात येत नसल्याचे माध्यमांना सांगितले होते.

राज्य सरकारने नेमलेल्या विमा कंपन्यांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना पैसे मागत आहेत

विमा कंपन्यांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी त्यांना पैसे मागत आहेत, ही बाब लक्षात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे ही जबाबदारी केंद्र सरकारची नाही तर ही राज्य सरकारची आहे. कारण या कंपन्या राज्यसरकारने नेमले आहेत. या खासगी कंपन्या आहेत. त्या केंद्र सरकारने नेमलेल्या नाहीत. त्यामुळे मंत्र्यांनी आणि शासनाने केंद्र आणि विमा कंपन्यांवर बोलण्याऐवजी शेतकऱ्यांना लाभ कसा मिळवून देता येईल, हे पाहावे. मात्र, राज्य सरकार आपले अपयश लपवण्यासाठी लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या मृत्यूंची संख्या लपवण्यात आली

महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या मृत्यूंची संख्या लपवण्यात आली आहे. त्यामुळेही मृत्यूंची खरी संख्या पुढे आली पाहिजे. सध्या कोरोनासोबतची लढाई अंतिम टप्प्यात आहे. ही लढाई आटोक्यात आल्यानंतर आम्ही निश्चितपणे आमच्याही स्तरावर याचे ऑडिट करू. यात कोणाच्या काय अडचणी होत्या, कोणाच्या काय चुका झाल्या, हे देखील पाहू. मात्र, यामध्ये ज्या गंभीर चुका असतील. तसेच काही सोयीच्या लोकांना मदत करण्यासाठी कोणी काही केले असेल तर याचा जाब आम्ही सरकारला विचारू, असे देखील शेवटी फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीस यांची परभणीत कोविड सेंटरला भेट; भाजप कार्यकर्त्यांकडून फिजीकल डिस्टन्सिंगचा फज्जा

Last Updated : Jun 2, 2021, 4:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.