परभणी - लॉकडाऊनमुळे देशी दारूची दुकाने तसेच वाईन शॉप बंद असल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी हातभट्टीची दारू चोरट्या मार्गाने विकल्या जात आहे. पोलिसांकडून यावर वारंवार कारवाया होत असल्या तरी काही आरोपींकडून ही दारू बनवण्याचे प्रकार सुरूच आहेत. मानवत तालुक्यातील अशाच एका ठिकाणी दारू बनवणाऱ्या हातभट्टीच्या अड्ड्यावर पोलिसांनी आज सोमवारी दुपारी छापा टाकून त्या ठिकाणचे सर्व रसायन आणि इतर साहित्य नष्ट केले, तर हा अड्डा चालवणार्या महिलेला देखील अटक करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस दलाच्या विशेष पथकाला मिळालेल्या माहितीनुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज सोमवारी दुपारी मानवत तालुक्यातील मनोली शिवारातील एका आखाड्यावर छापा टाकला. या ठिकाणी हातभट्टी दारु तयार करण्याचे रसायण होते. हा अड्डा सुनिता महादेव काळे (वय 39, रा. ढेंगळी पिंपळगाव, ता. सेलु) ही महिला चालवत होती. या ठिकाणी 40 हजार रुपयांचे 300 लिटर नवसागर, 200 लिटरच्या 2 प्लॉस्टिकच्या टाक्या तसेच 50 लिटरचे दोन मोठे प्लॉस्टिकचे कॅन एक व सडक्या रसायणाने भरलेल्यामोठ्या टाक्क्या सापडल्या. त्यामध्ये गावठी हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी आवश्यक गुळाचे पाणी, नवसागर, बिबव्याचे पाणी टाकण भिज् घातलेले सडके रसायन (मादक) व द्रव्याने भरलेल्या टाक्क्या जप्त करण्यात आल्या. त्यानंतर त्या जमिनीवर सांडून नष्ट करण्यात आल्या आहेत.
याची एकूण किंमत 45 हजार रुपये असून या मुदेमालासह महिला आरोपीला अटक करून तिच्यावर मानवत पोलिस ठाण्यात कलम 65, 188, 269, 270 भा.द.वि व राष्ट्रिय आपत्ती अधिनियम 2005 नुसार कलम 51 (ब) साथीचे रोग प्रतिबंधक कायदया प्रमाणे फिर्याद गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अपर पोलीस अधिक्षक राग सुधा, सपोनि एच. जी पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील हनुमान कच्छवे, सखाराम टेकुळे, जगदिश रेड्डी, श्रीकांत घनसावंत, घनसावंत, अतुल कांदे, पूजा भोरगे, गजेंद्र चव्हाण आदींनी केली आहे.