ETV Bharat / state

'पशुवैद्यकीय' प्रयोगशाळेत कोरोनाची चाचणी? ८२ लाखांचा प्रस्ताव शासन दरबारी - corona testing in parbhani

संपूर्ण जगात दहशत माजवणाऱ्या कोरोना विषाणूच्या निदानासाठी शहरातील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागात लस तयार होऊ शकते. यासाठी तीन शास्त्रज्ञांनी पुढाकार घेतला असून, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या मध्यस्थीने हा सुमारे 82 लाख रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

parbhani corona news
'पशुवैद्यकीय' प्रयोगशाळेत कोरोनाची चाचणी? ८२ लाखांचा प्रस्ताव शासन दरबारी
author img

By

Published : Mar 31, 2020, 5:05 PM IST

परभणी - संपूर्ण जगात दहशत माजवणाऱ्या कोरोना विषाणूच्या निदानासाठी शहरातील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागात लस तयार होऊ शकते. यासाठी तीन शास्त्रज्ञांनी पुढाकार घेतला असून, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या मध्यस्थीने हा सुमारे 82 लाख रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास त्यापुढील आठ दिवसात या प्रयोगशाळेचे काम सुरू होईल, अशी माहिती महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कंडेय यांनी दिली आहे.

parbhani corona news
'पशुवैद्यकीय' प्रयोगशाळेत कोरोनाची चाचणी? ८२ लाखांचा प्रस्ताव शासन दरबारी
कोरोनाच्या प्रसारामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक आजारी पडत असून यामुळे अनेकजण दगावले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ठिकठिकाणी कोरोना विषाणूच्या चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळा उभारण्यात येतील, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. याच पार्श्वभूमीवर परभणीसह हिंगोली आणि परिसरातील कोरोना संशयित रुग्णांच्या चाचण्या होण्याच्यादृष्टीने परभणीतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. आनंद देशपांडे आणि डॉ. सतीश गायकवाड या तीन शास्त्रज्ञांनी पुढाकार घेतला आहे.
यासंदर्भात डॉ. मार्कंडेय म्हणाले, कोरोना विषाणूची चाचणी होण्यासाठीची सर्व यंत्रणा आणि शास्त्रज्ञ परभणीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध आहेत. या ठिकाणची प्रयोगशाळा अत्याधुनिक असून फक्त कोरोनाच्या चाचणीसाठी लागणारे यंत्र, फोटोमीटर, डिफ्रिजर आदींसह सुरक्षेसाठी लागणारी सामुग्री उपलब्ध झाल्यास त्याच्या चाचण्या परभणीत होऊ शकतील. ही यंत्रणा उपलब्ध करून दिल्यानंतर केवळ आठ दिवसात प्रत्यक्ष कामालादेखील सुरुवात होणार आहे. तसेच संबंधित यंत्रणा या ठिकाणी आल्यास कोणत्याही साथीच्या आजारांच्या विषाणूंची तपासणी होऊ शकते. यासाठी ८२ लाख रुपयांचा प्रस्ताव दिला असून तो पुढील वर्षभरासाठी असल्याची माहिती डॉ. आनंद देशपांडे यांनी दिली. हा प्रस्ताव जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांच्यामार्फत हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला असून शासनाने याला लवकरात लवकर मंजुरी देऊन हे काम सुरू करण्याची परवानगी द्यावी, असे डॉ. मार्कंडेय म्हणाले.

दरम्यान, या ठिकाणी मुलींचे दीडशे बेडचे वसतिगृह रिकामे असून त्याचा विलगीकरण कक्ष करण्यासाठीदेखील उपयोग होईल. तसेच प्रयोगशाळेतदेखील स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचा संकल्प या शास्त्रज्ञांनी केलाय.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.