ETV Bharat / state

शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांना कोरोना तपासणी बंधनकारक ; परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

author img

By

Published : Nov 17, 2020, 9:05 PM IST

राज्यातील ९ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू कराव्यात, असे निर्देश महाराष्ट्र शासनाने दिले आहे. पण, त्यापूर्वी सर्व शिक्षकांनी स्वॅब टेस्ट करणे बंधनकारक असून कोरोना नियंत्रणात रहावा, यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील सर्व नियमांचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

परभणी - राज्यातील ९ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू कराव्यात, असे निर्देश महाराष्ट्र शासनाने दिले आहे. पण, या शाळा सुरू करण्यापूर्वी परभणी जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपल्या कोरोना चाचण्या करणे बंधनकारक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बजावले आहेत.

राज्य सरकारकडून कोव्हिड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहेत, त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांची नावे घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे 'अनलॉक'च्या प्रक्रियेत ज्या घोषणा शासनाकडून होत आहेत, त्याची अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

'स्वॅब' तपासणी बंधनकारक'

शासनाने राज्यातील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वीचे वर्ग तसेच इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वीचे वसतिगृह व आश्रमशाळा विशेषतः आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. मागील काही दिवसात करोनाबाधीत रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामूळे सर्वांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हयातील ९ वी ते १२ वी च्या शाळा तसेच वसतिगृह व आश्रमशाळा सूरू करण्यापूर्वी शासन परिपत्रकासोबत दिलेल्या मार्गदर्शक सूचना यांचे पालन करणे आवश्यक आहे. शिवाय स्थानिक परिस्थिती लक्षात घेता शिक्षकांनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी करोनाची आरटीपीसीआर (स्वॅब) चाचणी करणे आवश्यक आहे.

'शाळेतही कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक'

दरम्यान, जिल्ह्यातील सर्व संबंधित शिक्षकांनी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व महानगरपालिका रुग्णालयात तसेच महापालिकेने निश्चित केलेल्या केंद्रात जाऊन करोनाची चाचणी करुन घेणे बंधनकारक आहे, असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज (मंगळवारी) बजावले आहेत. तसेच त्यानंतर शाळा सुुरू झाल्यानंतर देखील शाळेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन, हॅण्डसॅनिटायझरचा वापर आणि मास्क लावणे बंधनकारक असून, त्याचे पालन होणे आवश्यक आहे. त्यासाठी देखील शाळा व्यवस्थापनाने खबरदारी घ्यावी, असे देखील जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.