ETV Bharat / state

शिर्डीकरांना प्रत्युत्तर... सोमवारी पाथरी राहणार बंद - साईबाबा मंदिर

शिर्डी सोमवारी बंद राहणार असेल तर, आम्ही पाथरी देखील सोमवारी बंद ठेवू, त्यानंतर जिल्हा आणि मराठवाडासुद्धा बंद ठेवण्यात येईल, असा इशारा पाथरी येथील साईबाबा जन्मस्थळ मंदिर कृती समितीचे अध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी दिला आहे.

pathari
आमदार बाबाजानी दुर्राणी
author img

By

Published : Jan 18, 2020, 6:53 PM IST

Updated : Jan 18, 2020, 7:01 PM IST

परभणी - साईबाबांच्या जन्मस्थळावरून देशभर वाद पेटला आहे. या वादात शिर्डीकरांनी कठोर भूमिका घेत, सोमवारी शिर्डी बंदची हाक दिली आहे. शिर्डीकरांना आतापर्यंत श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला देणाऱ्या पाथरीकरांनी देखील त्यांच्याच पद्धतीने उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. शिर्डी सोमवारी बंद राहणार असेल तर, आम्ही पाथरी देखील सोमवारी बंद ठेवू, त्यानंतर जिल्हा आणि मराठवाडासुद्धा बंद ठेवण्यात येईल, असा इशारा पाथरी येथील साईबाबा जन्मस्थळ मंदिर कृती समितीचे अध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी दिला आहे.

सोमवारी पाथरी राहणार बंद

हेही वाचा - साई जन्मस्थळाच्या वादातून शिर्डीसह 25 गावांत रविवारपासून बेमूदत बंद!

साईबाबा यांचा जन्म पाथरीत झाल्याचे पाथरीकरांकडे 29 पुरावे आहेत. शिवाय पाथरी येथे 1978 ला साईबाबांची मूर्ती स्थापना होऊन त्यांच्या मंदिराचीदेखील उभारणी झालेली आहे. हे मंदिर त्यांच्या आई-वडिलांच्या जून्या घरावरच उभारण्यात आले आहे. शिवाय या घराच्या अर्धवट भिंती आणि इतर काही साहित्य याठिकाणी आजही पाहायला मिळते. शिवाय विविध धार्मिक ग्रंथांमध्येसुद्धा साईबाबांचा जन्म पाथरीत असल्याचा पुरावा आहे. तसेच शिर्डीकर यांनी देखील काही प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये पाथरीत साईबाबांचा जन्म झाल्याचा उल्लेख होता; परंतु आता शिर्डीकर उल्लेख पुसून टाकत असल्याचा आरोप आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केला आहे.

'श्रद्धा आणि सबुरी' हा संपूर्ण मानवजातीला संदेश देणार्‍या साईबाबांच्या बाबतीत निर्माण झालेला हा वाद अत्यंत दुर्दैवी आहे. शिर्डीकरांनी हा वाद करू नये. साईबाबांच्या कर्मभूमीला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच जन्मभूमीला देखील आहे. त्यामुळे शिर्डीचे महत्त्व कमी होणार नाही. शिर्डीला चार लोक जातील तर पाथरीतही दोन लोक येतील, असेही आमदार बाबाजानी म्हणाले.

हेही वाचा - शिर्डी बंद; साई-मंदिरातील दैनंदीन कार्यक्रमात कोणताही बदल नाही

दरम्यान, शिर्डी येथील लोकांनी या वादाच्या मुद्द्यात बंदची हाक दिली आहे. सोमवारी ते बंद ठेवणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या बंदला उत्तर देण्यासाठी आम्हीसुद्धा सोमवारी पाथरी बंद करणार आहोत, गरज पडल्यास जिल्हा बंद ठेवू आणि त्यानंतर मराठवाडादेखील बंद करू, असा गर्भित इशारा देखील आमदार बाबजानी दुर्राणी यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिला.

Intro:परभणी - साईबाबांच्या जन्म स्थळावरून देशभर वाद पेटला आहे. या वादात शिर्डीकरांनी कठोर भूमिका घेत, सोमवारी शिर्डी बंदची हाक दिली आहे. शिर्डीकरांना आत्तापर्यंत श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला देणाऱ्या पाथरीकरांनी देखील त्यांच्याच पद्धतीने उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. शिर्डी सोमवारी बंद राहणार असेल तर आम्ही पाथरी देखील सोमवारी बंद ठेवू, त्यानंतर जिल्हा आणि मराठवाडा सुद्धा बंद ठेवण्यात येईल, असा इशारा पाथरी येथील साईबाबा जन्मस्थळ मंदिर कृती समितीचे अध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी दिला आहे.Body:साईबाबा यांचा जन्म पाथरीत झाल्याचे
पाथरीकरांकडे 29 पुरावे आहेत. शिवाय पाथरी येथे 1978 ला साईबाबांची मूर्ती स्थापना होऊन त्यांच्या मंदिराची देखील उभारणी झालेली आहे. हे मंदिर त्यांच्या आई-वडिलांच्या घरावरच उभारण्यात आले आहे. शिवाय या घराच्या अर्धवट भिंती आणि इतर काही साहित्य याठिकाणी आजही पहावयास मिळते. शिवाय विविध धार्मिक ग्रंथांमध्ये सुद्धा साईबाबांचा जन्म पाथरीत असल्याचा पुरावा आहे. तसेच शिर्डीकर यांनी देखील काही प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये पाथरीत साईबाबांचा जन्म झाल्याचा उल्लेख होता; परंतु आता शिर्डीकर उल्लेख पुसून टाकत असल्याचा आरोप आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी केला आहे. 'श्रद्धा आणि सबुरी' हा संपूर्ण मानव जातीला संदेश देणार्‍या साईबाबांच्या बाबतीत निर्माण झालेला हा वाद अत्यंत दुर्दैवी आहे. शिर्डीकरांनी हा वाद करू नये. साईबाबांच्या कर्मभूमीला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच जन्मभूमीला देखील आहे. त्यामुळे शिर्डीचे महत्त्व कमी होणार नाही. शिर्डीला चार लोक जातील तर पाथरीतही दोन लोक येतील, असेही आमदार बाबाजानी म्हणाले. दरम्यान, शिर्डी येथील लोकांनी या वादाच्या मुद्द्यात बंद ची हाक दिली आहे. सोमवारी ते बंद ठेवणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या बंदला उत्तर देण्यासाठी आम्ही सुद्धा सोमवारी पाथरी बंद करणार आहोत, गरज पडल्यास जिल्हा बंद ठेवू आणि त्यानंतर मराठवाडा देखील बंद करू, असा गर्भित इशारा देखील आमदार बाबजानी दुराणी यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिला.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- pbn_mla_babajani_marathi_1_to_1_on_pathri_closeConclusion:
Last Updated : Jan 18, 2020, 7:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.