ETV Bharat / state

गस्तीवरील पोलीस व्हॅनची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भिंतीला धडक - पोलिसांच्या गाडीची धडक parbhani

परभणीमध्ये गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या गाडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संरक्षक कठड्याला जावून धडकल्याने अपघात झाला आहे. या अपघातात गाडीतील चालकासह अन्य तीन कर्मचाऱ्यांना सुदैवाने कोणतीच इजा झाली नाही.

parbhani
गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या गाडीची परभणीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भिंतीला धडक
author img

By

Published : Jan 29, 2020, 7:45 AM IST

परभणी - येथील ग्रामीण पोलीस ठाण्याचे गस्त घालणारे वाहन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभवोतीचा कठडा तोडून आतमध्ये घुसल्याची घटना पहाटे साडेचार वाजता घडली आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही घटना घडली. यावेळी गाडीमध्ये चार पोलीस कर्मचारी होते. सुदैवाने यापैकी कोणालाही इजा झाली नाही.

गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या गाडीची परभणीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भिंतीला धडक

हेही वाचा - "मोदी सरकारचा 'एनआरसी आणि सीएए'च्या माध्यमातून हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगे घडवण्याचा कट"

परभणी शहरात चार पोलीस ठाणे असून त्यापैकी ग्रामीण पोलीस ठाण्याचे दरोडा गस्त वाहन नियमितपणे वसमत रोड वरून गावात येत होती. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास चालक अनिल गायकवाड यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संरक्षण भिंतीला जावून धडकली. भिंत तोडून ही गाडी जवळपास तीन फूट आतमध्ये घुसली. सुदैवाने या अपघातात गाडीमधील एकाही कर्मचाऱ्याला इजा झाली नाही. कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलीस मुख्यालयाला याबाबत कळवून क्रेनच्या सहाय्याने ही गाडी बाहेर काढली. या घटनेत संरक्षण भिंतीचे नुकसान झाले. तसेच गाडीच्या पुढील बाजूचेही थोडे नुकसान झाले आहे.

Intro: परभणी - येथील ग्रामीण पोलीस ठाण्याची पेट्रोलिंग ची व्हॅन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासभवोताल असलेला कठडा तोडून आत मध्ये घुसल्याची घटना पहाटे साडेचार वाजता घडली आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही घटना घडली असून, गाडीमध्ये चार पोलिस कर्मचारी होते. सुदैवाने यापैकी कोणालाही इजा झाली नाही.Body: परभणी शहरात चार पोलीस ठाणे असून त्यापैकी ग्रामीण पोलीस ठाण्याची दरोडा पेट्रोलिंग व्हेन नियमितपणे वसमत रोड वरून गावात येत होती. पहाटे 4:30 वाजता या दरोडा पेट्रोलिंग व्हॅनचा चालक अनिल गायकवाड यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने ती गाडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संरक्षण भिंतीला जावून धडकली. भिंत तोडून ही गाडी जवळपास 3 फूट आत मध्ये घुसली. सुदैवाने यात गाडीमधील एकाही कर्मचाऱ्याला मार लागलेला नाही. कर्मचाऱ्याने तात्काळ पोलीस मुख्यालयाला कळवून क्रेनच्या सहाय्याने ही गाडी बाहेर काढली. या घटनेत संरक्षण भिंती चे नुकसान झाले. तसेच गाडीच्या पुढील बाजूचे थोडेशे नुकसान झाले आहे. दरम्यान, गाडीत चालकासह इतर तीन कर्मचारी असल्याची माहिती असून ते सर्वजण सुखरूप आहेत.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :-pbn_statue_wall_broken_by_police_van_visConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.