ETV Bharat / state

पाच गावांना कॅनॉलचे पाणीच पोहोचेना; 'राष्ट्रवादी'कडून जलसमाधी आंदोलनाचा इशारा - water

दर वेळी जायकवाडी उपविभाग पाथरीकडून वरील गावांसाठी सवतासुभा केला जात असल्याची भावना शेतकरी वर्गातुन व्यक्त होत आहे.  त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कार्तिक घुंबरे पाटील यांनी निवेदनाव्दारे आंदोलनाचा ईशार दिला आहे.

निवेदन देताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते
author img

By

Published : Mar 1, 2019, 8:56 PM IST

परभणी - पाथरी तालुक्यातील मुदगल, वाघाळा, विटा, फुलारवाडी, कुभारी, वांगी, लिंबा या गावांना अद्यापही जायकवाडीच्या कॅनॉलचे पाणी मिळालेले नाही. दोन दिवसात पाणी शेवटपर्यंत पोहोचवा, अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने शेतकऱयांनासोबत घेऊन जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

या संदर्भात जायकवाडीच्या उपविभाग क्र. ६ च्या उप अभियंत्यास शुक्रवारी (१ मार्च) निवेदन दिले आहे. तालुक्यातील बी ५९ क्रमांकाच्या चारीला महिनाभरापासून पाणी सुरू आहे. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे मुदगल, वाघाळा, फुलारवाडी, लिंबा, विटा, वांगी आणि कुंभारी या गावातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही.

पहिल्या पाण्यावर पेरणी केलेल्या ज्वारीसाठी आता गरज असताना पाणी मिळत नसल्याने हे पीक हातचे जाणार आहे. पाऊस नसल्याने या भागातील शेतकऱयांनी पाटाच्या पाण्यावर शेती ओली करून पेरणी केली होती. याबरोबरच पाथरी तालुक्याच्या याभागात पर्जन्यमान कमी झाल्याने पाणी पातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचेही मोठे संकट असून या वेळी या भागात पाणी न गेल्यास गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे वरील गावांना नियोजन करून पाणी सोडण्याची मागणी होत आहे.

दर वेळी जायकवाडी उपविभाग पाथरीकडून वरील गावांसाठी सवतासुभा केला जात असल्याची भावना शेतकरी वर्गातुन व्यक्त होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कार्तिक घुंबरे पाटील यांनी निवेदनाव्दारे आंदोलनाचा ईशार दिला आहे. या वेळी पंचायत समिती सदस्य अजय थोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णू काळे आणि शेतकऱयांची उपस्थिती होती.

undefined

Intro:परभणी - पाथरी तालुक्यातील मुदगल, वाघाळा, विटा, फुलारवाडी, कुभारी, वांगी, लिंबा या गावांना अद्यापही जायकवाडीच्या कॅनॉलचे पाणी मिळालेले नाही. दोन दिवसात पाणी शेवटपर्यंत पोहचवा, अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने शेतक-यांना सोबत घेऊन जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.Body: या संदर्भात जायकवाडीच्या उपविभाग क्र.६ च्या उप अभियंत्यास शुक्रवारी (१मार्च) निवेदन दिले आहे. तालुक्यातील बी ५९ क्रमांकाच्या चारीला महिणाभरापासून पाणी सुरू आहे. मात्र ढिसाळ नियोजनामुळे मुदगल, वाघाळा, फुलारवाडी, लिंबा, विटा, वांगी आणि कुंभारी या गावातील शेतक-यांना
पाणी मिळत नाही. पहिल्या पाण्यावर पेरणी केलेल्या ज्वारीसाठी आता गरज असतांना पाणी मिळत नसल्याने हे पिक हातचे जाणार आहे. पाऊस नसल्याने या भागातील शेतक-यांनी पाटाच्या पाण्यावर शेत ओलाऊन पेरणी केली होती. आता ज्वारी पोट-याच्या अवस्थेत असल्याने पाण्याची अत्यंत गरज आहे. या बरोबरच पाथरी तालुक्याच्या याभागात पर्जन्यमान कमी झाल्याने पाणी पातळी कमालीची खालावली असून पिण्याच्या पाण्याचेही मोठे संकट असून या वेळी या भागात पाणी नाही गेल्यास गंभिर प्रश्न निर्माण होणार असून वरील गावांना नियोजन करून पाणी सोडावे. जागोजागच्या चा-या बंद करून पाणी शेवट पर्यंत पोहोचण्या साठी आपल्या कर्मचा-यां मार्फत उपाय योजना कराव्यात. पाणी बंद होणा-या साठी दोन तीन दिवस राहीले तरी अद्याप आपले कुठलेही नियोजन दिसून येत नाही. पाथरी तालुक्याचा नेमका हाच भाग तिव्र दुष्काळी भाग म्हणून पाहीला जातोय या भागात सरासरीच्या पन्नास टक्के हुन कमी पाऊस झालेला आहे. खरीप आणि रब्बही हातची गेली असतांना काही अशी ज्वारीचे पीक हाती लागुन मानसांचा आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या पाणी पाळी मुळे सुटू शकतो असे शेतकरी सांगत आहेत.मात्र दर वेळी जायकवाडी उपविभाग पाथरी कडून वरील गावांसाठी सवतासुभा केला जात असल्याची भावना शेतकरी वर्गातुन व्यक्त होत आहे.त्या मुळे शनिवार २ मार्च पर्यंत वरील गावां साठी त्वरीत पाणी सोडावे अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तीन मार्च रोजी शेतक-यांना सोबत घेऊन जल समाधी आंदोलन करेल याची गांभिर्यांने नोंद घ्यावी असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष कार्तिक घुंबरे पाटील यांनी निवेदना व्दारे दिला आहे.या वेळी पं स सदस्य अजय थोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णू काळे आणि शेतक-यांची उपस्थिती होती.
- गिरीराज भगत, परभणी
- सोबत - फोटोConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.