ETV Bharat / state

परभणीत आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी उसळला भीमसागर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील पुतळा परिसराला सजवण्यात आले होते. याठिकाणी पुस्तक आणि साहित्य विक्रीचे दुकाने थाटली असून भीमसैनिकांची मोठी रेलचेल दिसून आली.

परभणीत आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी उसळला भीमसागर
author img

By

Published : Apr 15, 2019, 8:41 AM IST

परभणी - येथील रेल्वेस्थानक पुढे असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांची मोठी रीघ लागली होती. सकाळी बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर दिवसभर पुतळ्याला हार घालण्यासाठी नागरिकांची रांग लागली होती. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पथसंचलन करून अभिवादन केले. तर, रात्री उशिरा शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील पुतळा परिसराला सजवण्यात आले होते. याठिकाणी पुस्तक आणि साहित्य विक्रीचे दुकाने थाटली असून भीमसैनिकांची मोठी रेलचेल दिसून आली. १४ एप्रिलला सकाळपासूनच भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात आली.

परभणीत आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी उसळला भीमसागर

यावेळी विविध सामाजिक राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार राजेश विटेकर, शिवसेनेचे खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाधिकारी पी शिवशंकर, आयुक्त रमेश पवार यांच्यासह विविध पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.

त्यानंतर दिवसभर सामान्य नागरिक आणि समाज बांधवांची अभिवादनासाठी रीघ लागली होती. दरम्यान, सायंकाळी आठ वाजेनंतर शहरातील शिवाजी चौकातून विविध ठिकाणच्या मिरवणुका मुख्य मार्गाने मार्गस्थ झाल्या. यात ढोल ताशाच्या गजरात तरुणांनी ताल धरला होता, तर विविध मंडळाच्या वतीने सजीव देखावे सादर करण्यात आले. ही मिरवणूक रात्री उशिरापर्यंत चालली.

Intro:परभणी - येथील रेल्वेस्थानक पुढे असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांची मोठी रीघ लागली होती. सकाळी बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर दिवसभर पुतळ्याला हार घालण्यासाठी नागरिकांची रांग लागली होती. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पथसंचलन करून अभिवादन केले. तर रात्री उशिरा शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.Body: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील पुतळा परिसराला सजवण्यात आले होते. याठिकाणी पुस्तक आणि साहित्य साहित्य विक्रीचे दुकाने थाटली असून भीमसैनिकांची मोठी रेलचेल दिसून आली. सकाळपासूनच भीमसैनिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी विविध सामाजिक राजकीय पक्ष्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार राजेश विटेकर, शिवसेनेचे खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाधिकारी पी शिवशंकर, आयुक्त रमेश पवार यांच्यासह विविध पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर दिवसभर सामान्य नागरिक आणि समाज बांधवांची अभिवादनासाठी रीघ लागली होती. दरम्यान, सायंकाळी आठ वाजेनंतर शहरातील शिवाजी चौकातून विविध ठिकाणच्या मिरवणुका मुख्य मार्गाने मार्गस्थ झाल्या. यात ढोल ताशाच्या गजरात तरुणांनी ताल धरला होता, तर विविध मंडळाच्या वतीने सजीव देखावे सादर करण्यात आले. ही मिरवणूक रात्री उशिरापर्यंत चालली.

- गिरीराज भगत परभणी.
- सोबत :- visConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.