ETV Bharat / state

परभणी : आमदार निलंबनाच्या निषेधार्थ भाजपचे निदर्शने, पुतळा दहन करण्यावरून तणाव - bjp MLA suspension news

भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करण्याचा जो निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला, त्याचा परभणी महानगर भाजपच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात आंदोलन करुन जाहीर निषेध करण्यात आला.

parbhani bjp
भाजपचे परभणीत निदर्शने
author img

By

Published : Jul 6, 2021, 7:20 PM IST

Updated : Jul 6, 2021, 8:41 PM IST

परभणी - विधानसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना 1 वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज (मंगळवारी) परभणीत भाजपच्या महानगर शाखेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात निदर्शने करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांनी केला. परंतु त्यापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांकडून हा पुतळा हिसकावून ताब्यात घेेेतला. मात्र, पुतळा ओढाओढीच्या प्रकारामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

आमदार निलंबनाच्या निषेधार्थ भाजपचे परभणीत निदर्शने
  • कार्यकर्ते-पोलिसात वाद -

भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करण्याचा जो निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला, त्याचा परभणी महानगर भाजपच्यावतीने जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात आंदोलन करुन जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी सरकार विरोधी घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केल्यावरून पोलीस व भाजप कार्यकर्त्यात चांगलाच वाद निर्माण झाला.

  • धरपकडीमुळे आंदोलनस्थळी गोंधळ -

यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी 12 आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याची तयारी सुरू केली. मात्र, ही बाब पोलिसांना समजताच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आंदोलनापासून परावृत्त केले. सुमारे अर्धा ते पाऊण तास चाललेल्या या धरपकडीमुळे आंदोलनस्थळी एकच गोंधळ निर्माण झाला होता. या आंदोलना दरम्यान नवामोंढा पोलिसांनी भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे, सुनील देशमुख, समीर दुधगावकर यांच्यासह सुमारे ६० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

  • सरकारच्या दडपशाहीचा निषेध -

'ही दडपशाही असून, महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा समोर आणल्यामुळेच हे सरकार सूडबुद्धीने विरोधकांचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी पोलिसांमार्फत अशी तुघलकी कारवाई करण्यात आली. या घटनेचा भाजपच्यावतीने निषेध करण्यात येत असल्याचे भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे व युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे म्हणाले.

  • आंदोलनात यांचा सहभाग -

या आंदोलनात भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोहन कुलकर्णी, मनपा गटनेत्या मंगल मुदगलकर, नगरसेवक मधुकर गव्हाणे, सुनिल देशमुख, संघटन सरचिटणीस एन.डी. देशमुख, मंडळाध्यक्ष भीमराव वायवळ, सरचिटणीस दिनेश नरवाडकर, विजय गायकवाड, बाळासाहेब जाधव, समिर दुधगावकर, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष अतिक पटेल, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भालचंद्र गोरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सुप्रिया कुलकर्णी, युवा जिल्हाध्यक्ष रामदास पवार, संतोष सोनवणे, सिंकदर खान, संजय शामर्थी, गणेश देशमुख, गीता सुर्यवंशी, प्रिया पेदापल्ली, युवा मोर्चाचे संदिप शिंदे, शिवाजी शेळके, दीपक शिंदे, अनंता गिरी, माऊली कोपरे, राजेश बालटकर, दिलीप काळदाते आणि कार्यकर्ते सहभाागी झाले होते.

Last Updated : Jul 6, 2021, 8:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.