ETV Bharat / state

शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका सोडलीये... - अब्दुल सत्तार यांचा राजीनामा

शिवसेना आता हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ऐवजी वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणू लागले आहे. तसेच महाशिव आघाडीची महाविकास आघाडी झाली. सावरकरांचा अपमान झाला तरी शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Jan 4, 2020, 11:50 PM IST

पुणे - शिवसेना आता हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ऐवजी वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणू लागले आहेत. महाशिव आघाडीची आता महाविकास आघाडी झाली. सावरकरांचा अपमान झाला तरीही शिवसेनेने त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही, असे बोलत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेने आपली हिंदुत्वाची भूमिका सोडली असल्याची टीका केली आहे. बारामतीत भाजप कार्यालयाला भेट दिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.

शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका सोडल्याची चंद्रकांत पाटील यांची टीका...

हेही वाचा... 'ज्यांच्या बापजाद्यांनी ब्रिटिशांचे पाय चाटले ते आमच्याकडे नागरिकत्वाचा पुरावा मागतायेत'

मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या सेवा दलाने काढलेल्या पुस्तकातून नथुराम गोडसे आणि सावरकर यांचे शारीरिक संबंध होते, असे छापले असतानाही शिवसेना अद्याप यावर गप्पच आहे. तसेच या संदर्भात सावरकरांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दिवसभर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तरिही मुख्यमंत्र्यांकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा.... बीड जिल्हा परिषदेत भाजपने मैदान सोडले, पंकजा मुंडेंकडून पराभव मान्य

राज्याच्या एकूण आर्थिक बजेट पैकी 75 टक्के बजेटची खाती राष्ट्रवादीकडे आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीला सर्वात जास्त मंत्रीपद दिली आहेत. जी पदे तकलादू आहेत, तसेच ज्या विभागाकडे निधी नसतो. अशी खाती काँग्रेस शिवसेनेला मिळाली आहेत. त्यामुळे हे सरकार फार काळ चालणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले आहे.

हेही वाचा... नाशिकहून गंगासागरला जाणारी भाविकांची बस पलटली; अपघातात एकाचा मृत्यू तर, 26 जण जखमी

शिवसेनेने नागरिकत्व कायद्याला लोकसभेत पाठिंबा दिला. मात्र राज्यसभेत ते तटस्थ राहिले. कारण सोनिया गांधींनी त्यांना दम दिला होता की, नागरिकत्व कायद्यासंबंधी आमच्या भूमिकेशी ठाम राहा. अन्यथा आम्ही पाठिंबा काढून घेऊ, असा खळबळजनक खुलासा पाटील यांनी केला. तसेच सोनिया गांधींचा आता असा आग्रह आहे की, काँग्रेसचे कार्यकर्ते जसे नागरिकत्व कायदा विरोधात गावोगावी रस्त्यावर उतरून विरोध करीत आहे. तसाच शिवसेनेने त्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरत विरोध करायला पाहिजे. तेव्हा आता पाहुयात की शिवसेना रस्त्यावर उतरते का ते, असे बोलत पाटील यांनी शिवसेनेला चिमटा काढला.

हेही वाचा... 'आम्ही ८० तर तुम्ही १८ टक्के, सीएएला विरोध करू नका, नाहीतर...'

महाविकास आघाडीत खातेवाटपावरुन जोरात वाद सुरू आहे. त्यातूनच अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिल्याचे समजत आहे. मात्र, ही सुरुवात आहे. याचे पर्यावसन काय होईल, हे सामान्य माणसांना देखील कळू लागले आहे. राज्य आता देवाच्या भरवशावर सुरू आहे. कोणत्याही खात्याला मंत्री नाहीत. दोन महिन्यांपासून गोंधळ चालू आहे. शपथा झाल्या तरी अजून खातेवाटप नाही, यांच्यात खूप भांडणे असल्याचेही पाटील यांनी सांगितले. तसेच त्यांचे वाद त्यांना लखलाभ होवोत पण सामान्य जनता भरडली जातेय, असा काळजीचा सुरही त्यांनी आळवला.

Intro:Body: बारामती...

शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका सोडली..

शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका सोडली आहे. शिवसेना आता हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ऐवजी वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणू लागले आहेत.. महाशिव आघाडीची महाविकास आघाडी झाली. सावरकरांचा अपमान झाला. तरी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही.. तसेच मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या सेवा दलाने काढलेल्या पुस्तकातून नथुराम गोडसे आणि सावरकर यांचे शारीरिक संबंध होते असे, छापले असतानाही शिवसेना अद्याप यावर गप्पच आहे. तसेच या संदर्भात सावरकर यांचे कुटुंबीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शी दिवसभर संपर्क  साधत असतानाही मुख्यमंत्र्यांकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगून  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सेनेचा खरमरीत समाचार घेतला.. 

बारामती येथील भाजप कार्यालयात पाटील पत्रकारांशी बोलत होते...

राज्याच्या एकूण आर्थिक बजेट पैकी 75% बजेटची खाती राष्ट्रवादीकडे असून, महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीला सर्वात जास्त मंत्रीपद दिले आहेत.. जी पदे तकलादू आहेत..ज्या विभागाकडे निधी नसतो. बजेट नसते, अशी खाती काँग्रेस शिवसेनेला मिळाली आहेत त्यामुळे हे फार काळ चालणार नाही अशी टीका  पाटील यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना केली...

सेनेने नागरिकत्व कायद्याला लोकसभेत पाठिंबा दिला.. मात्र राज्यसभेत ते तटस्थ राहिले. कारण सोनिया गांधींनी त्यांना दम दिला होता की, नागरिकत्व कायद्यासंबंधी आमच्या भूमिकेशी ठाम राहा. अन्यथा आम्ही पाठिंबा काढून घेऊ... आता सोने गांधींचा असा ग्रह आहे की काँग्रेसचे कार्यकर्ते जसे नागरिकत्व कायदा विरोधात गावोगावी रस्त्यावर उतरून विरोध करीत आहे तसेच तुम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरा.. आता बघुयात सेना रस्त्यावर उतरते का. असेही पाटील म्हणाले...

  महा विकास आघाडी खातेवाटपावरुन जोरात वाद सुरु आहे. त्यातूनच अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिल्याचं समजतंय.. ही सुरुवात आहे.. याचं पर्यावसन काय होईल हे सामान्य माणसांना हि कळू लागले आहे...राज्य देवाच्या भरवश्यावर सुरु आहे.. कोणत्याही खात्याला मंत्री नाहीत.. दोन महिन्यांपासून गोंधळ चालू आहे.. शपथा झाल्या तरी अजून खातेवाटप नाही, यांच्यात खूप भांडणं असल्याचे सांगत.. त्यांचे वाद त्यांना लखलाभ होवोत.. पण सामान्य जनता भरडली जातेय.. असे पाटील म्हणाले..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.