परभणी - बँकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. या संपाला परभणीत चांगला प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळाले. परभणीतील सर्वच बँकांनी या संपात सहभाग घेतल्याचे दिसून आले.
वेतनवाढ व ५ दिवसांचा आठवडा आणि इतर मागण्यांसाठी बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सगळीकडेच या संपाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परभणीतही सर्व बँक अधिकाऱ्यांनी एकत्र येत संपात सहभाग नोंदवला. तसेच बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेने जिल्हाधिकार्यांना निवेदनही दिले.
हेही वाचा - दिल्लीतील 'निर्भया' प्रकरणातील दोषींना उद्या फाशी नाही..
हेही वाचा - "सारथी संस्थेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप खोटे, कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार"
बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २ दिवसीय देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. परभणीत या संपाला जोरदार प्रतिसाद मिळाला. पगार पत्रकाच्या घटकांवर 20 टक्के वेतनवाढ द्यावी, 5 दिवसांचा आठवडा करण्यात यावा, अधिकाऱ्यांसाठी निर्धारीत कामाचे तास, कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान वेतन आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातही या संपाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. संपामुळे बँकेचे कामकाज ठप्प झाले आहे. २ दिवसांचा संप व त्यानंतर रविवार असल्याने बँका ३ दिवस बंद राहणार आहेत. यामुळे व्यापारी व ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. दरम्यान, संपाच्या पार्श्वभूमीवर बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यावेळी कर्मचाऱ्यांनी बँकेसमोर घोषणाबाजी केली.