ETV Bharat / state

'पाथरी हीच साईबाबांची जन्मभूमी, दावा कधीही सोडणार नाही' - शिर्डी साई मंदिर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना साई जन्मभूमी पाथरी असल्याचे वक्तव्य केले होते. याला आक्षेप घेत शिर्डीकरांनी बंद पुकारून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी पाथरीला साई जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून निधी दिल्याचे सांगितले होते. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Babajani Durrani
'पाथरी हीच साईबाबांची जन्मभूमी, दावा कधीही सोडणार नाही'
author img

By

Published : Jan 21, 2020, 8:57 PM IST

परभणी - पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी असून आम्ही याबाबतचा दावा कधीही सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांनी साईबाबांचा जन्म कुठे झाला, कधी झाला याचा शोध घेण्यासाठी समिती नेमावी, असे आवाहन पाथरीत साईबाबा जन्मस्थळ कृती समितीचे अध्यक्ष आणि आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी केले. 'दूध का दूध-पानी का पानी' होऊ द्या म्हणजे साईबाबांच्या जन्मावरून पुन्हा कुठलाही वाद होणार नाही, असे परखड मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

'पाथरी हीच साईबाबांची जन्मभूमी, दावा कधीही सोडणार नाही'

हेही वाचा - 'बाबांच्या नामस्मरणामुळे मनातील द्वेष निघून जातो' पाथरीकरांनी दररोज महाआरती करावी, शिर्डीकरांचा सल्ला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना साई जन्मभूमी पाथरी असल्याचे वक्तव्य केले होते. याला आक्षेप घेत शिर्डीकरांनी बंद पुकारून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी पाथरीला साई जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून निधी दिल्याचे सांगितले होते. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

हेही वाचा - पाथरी जन्मस्थान तर शिर्डीला साईंची समाधी - प्रताप पाटील-चिखलीकर

साईबाबांची जन्मभूमी पाथरीच आहे, हे जगाला आणि शासनाला पटवून देण्यासाठी परभणीतील सर्वपक्षीय नेते आणि लोकप्रतिनिधी एकवटले आहेत. यातूनच आज पाथरी येथे साई जन्मभूमी मंदिराच्या सभागृहात आमसभा घेण्यात आली. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष म्हणून भूमिका मांडताना आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी शिर्डीकरांवर कडाडून टीका केली. 'साईबाबांनी जात, धर्म सांगितलेला नाही, असे शिर्डीकर म्हणतात. पण आम्ही म्हणतो साई बाबांचा जन्म कुठे झाला? या मुद्द्यावर तुम्ही बोला. साईबाबांचा जन्म पाथरीत झाला नसेल, तर कुठे झाला याचे पुरावे द्या' असे आव्हान दुर्रानी यांनी दिले.

हेही वाचा - ...म्हणून शिर्डीकरांचा पाथरीला विरोध; परभणीतील साईभक्तांचा आरोप

साईबाबांच्या जन्मस्थळाचे पुरावे शिर्डीकरांनी गहाळ केल्याचा आरोप दुर्रानी यांनी यावेळी केला. पाथरी साईबाबांची जन्मभूमी असल्याचे २९ पुरावे असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. साईबाबांचा जन्म पाथरीत झाला, ही 'काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे', असेही शेवटी आमदार दुर्रानी म्हणाले. या सभेच्या व्यासपीठावर खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, सुरेश वरपुडकर, माजी आमदार मोहन फड, मंदिर संस्थानचे अध्यक्ष सखाराम धानु, विश्वस्त संजय भुसारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सदस्य तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Intro:परभणी - पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी असून आम्ही जन्मभूमीचा दावा कधीही सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांनी साईबाबांचा जन्म कुठे झाला, कधी झाला, याचा शोध घेण्यासाठी समिती नेमावी. 'दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या' म्हणजे साईबाबांच्या जन्मावरून पुन्हा कुठलाही वाद होणार नाही, असे आव्हान आज पाथरी येथे साईबाबा जन्मस्थळ कृती समितीचे अध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शासनालाच दिले आहे.Body:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यात साई जन्मभूमी पाथरी असल्याचे वक्तव्य केले होते, याला आक्षेप घेत शिर्डीकरांनी बंद पुकारून मुख्यमंत्र्यांना भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पाथरीला साई जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून निधी दिल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटल्याचे सांगितले; परंतु साईबाबांची जन्मभूमी पाथरीच आहे, हे जगाला आणि शासनाला पटवून देण्यासाठी परभणीतील सर्वपक्षीय नेते आणि लोकप्रतिनिधी एकवटले आहेत. यातूनच आज पाथरी येथे साई जन्मभूमी मंदिराच्या सभागृहात भव्य अशी आमसभा घेण्यात आली. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष म्हणून भूमिका मांडतांना आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी शिर्डीकरांवर कडाडून टीका केली ते म्हणाले, 'साईबाबांनी जात धर्म सांगितलेला नाही, असे शिर्डीवाले म्हणतात, पण आम्ही म्हणतो साई बाबांचा जन्म कुठे झाला ? या मुद्द्यावर तुम्ही बोला, साईबाबांचा जन्म पाथरी झाला नसेल तर कुठे झाला याचे पुरावे तुम्ही द्या. अन्यथा आम्ही दिलेले पुरावे मान्य करा. मात्र ज्या-ज्यावेळी जन्मस्थळाचा मुद्दा उपस्थित होतो, त्यावेळी शिर्डीकर आक्रमक भूमिका घेतात, साईबाबांचे जन्मस्थान पाथरी नाही म्हणतात, साईबाबांच्या जन्मस्थळाचे त्यांच्याकडील पुरावे सुद्धा शिर्डीकरांनी गायब केले आहेत. पण आमच्याकडे 29 अधिकृत पुरावे आहेत हे मान्य करावेत, यासाठी मुख्यमंत्र्यांनी शिर्डीकरांना बोलावलं त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा बोलवावं. आमचं म्हणणं ऐकून घ्यावं, कारण कुठल्याही वादात दोन्हीकडच्या बाजू ऐकून घ्याव्या लागते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना हवा तो निर्णय द्यावा. कारण कितीही झालं तरी सत्य लपून राहू शकत नाही, साईबाबांचा जन्म पाथरीत झाला, हे 'काळ्या दडावरची पांढरी रेषा आहे', असेही शेवटी आमदार दुर्रानी म्हणाले. या सभेच्या व्यासपीठावर खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, सुरेश वरपुडकर, माजी आमदार मोहन फड, मंदिर संस्थानचे अध्यक्ष सखाराम धानु, विश्वस्त संजय भुसारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सदस्य तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. तर या आमसभेला परभणी जिल्ह्यातील तसेच इतर भागातून आलेले साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- pbn_pathri_amsabha_babajani_byte (ready to use )Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.