ETV Bharat / state

'पाथरी हेच साईंचे जन्मस्थळ, मुख्यमंत्र्यांकडे २९ पुरावे सादर करू' - पाथरी

'अगदी सुरुवातीपासून आम्ही पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी आहे म्हणूनच विकासाची मागणी करत आहोत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विकासाचा आराखडा दिला होता. तो त्यांनी मंजूर केला', अशी माहिती दुर्रानी यांनी दिली.

durrani
मुख्यमंत्र्यांकडे २९ पुरावे सादर करू, आमदार बाबाजानी दुर्रानींचा दावा
author img

By

Published : Jan 20, 2020, 8:52 PM IST

परभणी - शिर्डीकर त्यांच्या स्वार्थासाठी पाथरी येथील साईबाबांचे जन्मस्थान नाकारत असतील, तर ही भूमिका आम्हाला मान्य नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाथरी हेच जन्मस्थळ असल्याचे २९ पुरावे सादर करू, असा दावा आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला.

मुख्यमंत्र्यांकडे २९ पुरावे सादर करू, आमदार बाबाजानी दुर्रानींचा दावा

हेही वाचा - साई जन्मस्थान वाद: शिर्डी, पाथरी नाही तर 'या' ठिकाणी साईबाबा सर्वप्रथम दिसले

'अगदी सुरुवातीपासून आम्ही पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी आहे म्हणूनच विकासाची मागणी करत आहोत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विकासाचा आराखडा दिला होता. तो त्यांनी मंजूर केला', अशी माहिती दुर्रानी यांनी दिली.
गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी असल्याचे सांगून या परिसराच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याला आक्षेप घेत शिर्डीकरांनी बंद पुकारला.

हेही वाचा - साई जन्मभूमी वाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी यशस्वी

या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत शिर्डीच्या शिष्टमंडळाला बोलावून त्यांची बाजू ऐकली. या नंतर ठाकरे यांनी पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी देऊ, असा निर्णय घेतला होता, असे सांगितले. परंतु या निर्णयाशी पाथरी येथील साईबाबा जन्मभूमी अध्यक्ष आणि आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी सहमती दर्शवली नाही. 'पाथरी ही जन्मभूमी म्हणूनच विकासासाठी निधी मागितला. आता जर शिर्डी ग्रामस्थ अर्थव्यवस्था कुठेतरी डगमगेल, या भीतीने पाथरीच्या जन्मभूमीला विरोध करत असतील तर ही त्यांची भूमिका आम्हाला मान्य नाही. जेवढे महत्त्व कर्मभूमीला आहे, तेवढेच जन्मभूमीलाही राहिल. भाविक शिर्डीलाही जातील आणि पाथरीलाही येतील', असे दुर्रानी म्हणाले.

हेही वाचा - 'होय..! २०१४ ला महाविकास आघाडीच्या स्थापनेसाठी प्रयत्न झाला होता'

मंगळवारी पाथरी येथे सर्वपक्षीय बैठक आणि महाआरती होणार आहे. त्या बैठकीत आम्ही पुढील निर्णय घेऊ, अशी माहितीही यावेळी दुर्रानी यांनी दिली.

Intro:परभणी - 'अगदी सुरुवातीपासून आम्ही पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी आहे म्हणूनच विकासाची मागणी करत आहोत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विकासाचा आराखडा दिला होता. तो त्यांनी मंजूर केला. आता शिर्डीकर त्यांच्या स्वार्थासाठी पाथरी येथील साईबाबांचे जन्मस्थान नाकारत असतील तर ही भूमिका आम्हाला मान्य नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जन्मस्थळ असल्याचे 29 पुरावे सादर करू, त्यांचे समाधान करू, मात्र पाथरी हीच जन्मभूमी आहे, अशी ठाम भूमिका आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना घेतली आहे.
Body:मागील महिन्यात मराठवाड्याच्या दौर्‍यावर आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी ही साईबाबा यांची जन्मभूमी असल्याचे सांगून पाथरीच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीस मंजूरी दिली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यास आक्षेप घेत शिर्डीकरांनी बंद पुकारला. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत शिर्डीच्या शिष्टमंडळाला बोलावून त्यांची बाजू ऐकली. या नंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी देऊ, असा निर्णय घेतला होता, असे सांगितले. परंतु या निर्णयाशी पाथरी येथील साईबाबा जन्मभूमी अध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी सहमती दर्शवली नाही. ते म्हणाले, पाथरी ही जन्मभूमी म्हणूनच विकासासाठी निधी मागितला. आता जर शिर्डीवासीयांची अर्थव्यवस्था कुठेतरी डगमगेल, या भीतीने पाथरीच्या जन्मभूमी ला विरोध करत असतील तर ही त्यांची भूमिका आम्हाला मान्य नाही. जेवढे महत्त्व कर्मभूमीला आहे, तेवढेच जन्मभूमीला ही राहील. भाविक शिर्डीलाही जातील आणि पाथरीला येतील. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना आमच्याकडे असलेले सर्व पुरावे सादर करू. पाथरी हीच साईबाबांची जन्मभूमी असल्याचे देखील त्यांना पटवून देऊ, असेही आमदार बाबाजानी दुर्रानी म्हणाले. दरम्यान उद्या मंगळवारी यासंदर्भात पाथरी येथे सर्वपक्षीय बैठक आणि महाआरती होणार आहे. त्या बैठकीत आम्ही पुढील निर्णय घेणार आहोत, अशी माहिती यावेळी दुराणी यांनी दिली.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- pbn_mla_babajani_durani_byte_on_saibaba_birthplace_not_thirthsthalConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.