ETV Bharat / state

'आमदार आपल्या दारी' उपक्रमाचा साडेपाच हजार ऑटो रिक्षाधारकांना लाभ, सरकारी योजनांवरही मार्गदर्शन - license

या शिबिरात ऑटो, रिक्षा चालकांना शिकाऊ परवाना, चारित्र्य प्रमाणपत्र, पीयूसी पावती, परमिटसाठीचा ऑनलाईन फार्म भरणे, बॅच बिल्ला काढण्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली. तसेच ऑटो चालकांच्या कुटुंबियांना उज्वला गॅस, एसटीचे स्मार्टकार्ड, आधार कार्ड, श्रावणबाळ वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, आदींचा लाभ मिळवून देण्यात आला. तहसील आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर पार पडले.

ऑटोरिक्षा व्यवसाय मार्गदर्शन शिबिर
author img

By

Published : Sep 5, 2019, 4:02 AM IST

परभणी - शहरात काही दिवसांपूर्वी कागदपत्रांची तपासणी करत उपप्रादेशिक परिवहन विभागाने सुमारे ५०० ऑटोवर कारवाई केली होती. यामध्ये कागदपत्रांअभावी चालकांना हजारो रुपयांचा दंड भरावा लागला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने 'आमदार आपल्या दारी', या उपक्रमांतर्गत बुधवारी ऑटोरिक्षा व्यवसाय मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.

ऑटोरिक्षा व्यवसाय मार्गदर्शन शिबिर

हेही वाचा - परभणीत 'आरटीओ' ने पकडलेल्या ऑटोतून बॅटरी, टेपरेकॉर्डरसह पेट्रोल चोरी गेल्याने खळबळ

शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात हे शिबिर पार पडले. आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून हे शिबिर राबवण्यात आले. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटनदेखील करण्यात आले. या शिबिरात आरटीओसह शासकीय योजनांना लागणाऱ्या विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. या उपक्रमात साडेपाच हजार ऑटो रिक्षाधारक आणि त्यांच्या कुटुंबियांनी सहभाग घेतला होता.

हेही वाचा - ..नाही तर तुमची धुलाई करायला सांगीन; नितीन गडकरींची अधिकाऱ्यांना तंबी

या शिबिरात ऑटो, रिक्षा चालकांना शिकाऊ परवाना, चारित्र्य प्रमाणपत्र, पीयूसी पावती, परमिटसाठीचा ऑनलाईन फार्म भरणे, बॅच बिल्ला काढण्यासाठी आवश्यक ते सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली. तसेच ऑटो चालकांच्या कुटुंबियांना उज्वला गॅस, एसटीचे स्मार्टकार्ड, आधार कार्ड, श्रावणबाळ वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, आदींचा लाभ मिळवून देण्यात आला. तहसील आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर पार पडले.

हेही वाचा - परभणीतील 'त्या' जप्त ऑटो चालकांना 31 डिसेंबरपर्यंत मुदत; परिवहन मंत्र्यांचे आदेश

ऑटोरिक्षा चालकांना प्रत्यक्ष व्यवसाय करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यातच शासकीय कागदपत्रांची पूर्तता करताना मोठा त्रास सहन करावा लागतो. या त्यांच्या व्यवसायिक अडचणींवर आज मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती ऑटो संघटनेचे अध्यक्ष संभानाथ काळे यांनी दिली. या शिबिरात परभणी शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील नागरिक मोठया संख्येनं उपस्थित होते.

Intro:परभणी - परभणी शहरात काही दिवसांपूर्वी कागदपत्रांची तपासणी करत उपप्रादेशिक परिवहन विभागाने सुमारे पाचशे ऑटोवर कारवाई केली होती. यामध्ये कागदपत्रांआभावी त्यांना हजारो रुपयांचा दंड भरावा लागला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने 'आमदार आपल्या दारी', या उपक्रमांतर्गत आज ऑटोरिक्षा व्यवसाय मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या शिबिरात आरटीओ संबंधित तसेच शासकीय योजनांना लागणाऱ्या विविध कागदपत्रांची पूर्तता करून देण्यात आली. ज्यामध्ये तब्बल साडेपाच हजार ऑटोरिक्षाधारक व त्यांच्या कुटुंबीयांनी सहभागी होवून लाभ घेतला.Body:शहरातील रेल्वे स्टेशन पुढील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आज सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही शिबीर घेण्यात आले. आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या या शिबिरात ऑटोरिक्षा चालकांना शिकाऊ परवाना (लायसन्स), चारित्र्य प्रमाणपत्र, पीयूसी पावती, परमिटसाठीचा ऑनलाईन फार्म भरणे, बॅच बिल्ला काढण्यासाठी आवश्यक ते सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली. तसेच ऑटोचालकांच्या कुटुंबियांना उज्वला गॅस, एसटीचे स्मार्टकार्ड,
आधार कार्ड, श्रावणबाळ वृद्धपकाळ निवृत्ती वेतन आदी लाभ मिळवून देण्यात आले. यासाठी तहसील आणि उपप्रादेशिक परिवहन प्रशासनाचे कर्मचारी शिबिराच्या ठिकाणी बसून होते. या शिबिराला झालेल्या गर्दीवरून अजूनही बहुसंख्य नागरिक शासनाच्या विविध योजनांपासून वंचित असल्याचे दिसून येते. या शिबिराचे उद्घाटन आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या हस्ते व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले.
दरम्यान, ऑटोरिक्षा चालकांना प्रत्यक्ष व्यवसाय करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यातच शासकीय कागदपत्रांची पूर्तता करताना मोठा त्रास सहन करावा लागतो. या त्यांच्या व्यवसायिक अडचणींवर मार्गदर्शन करण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजना त्यांना देण्यासाठी आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या विविध कागदपत्रे, परवाने तसेच कायदेशीर मार्गदर्शनासाठी हे शिबिर घेण्यात आले असून याचा सुमारे साडे पाच हजार ऑटोचालक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी लाभ घेतल्याची माहिती ऑटो संघटनेचे अध्यक्ष संभानाथ काळे यांनी दिली. या शिबिरासाठी नंदू अवचार, ज्ञानेश्वर पवार, अनिल डहाळे, नवनीत पाचपोर, उद्धवराव मोहिते, दिलीप गिराम तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. शिबिरात परभणी शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची मोठया प्रमाणात उपस्थित दिसून आली.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- camp vis & byte :- संभानाथ काळे, ऑटो संघटना अध्यक्ष.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.