परभणी - जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघांमध्ये प्रत्येक पक्षाला संधी मिळाली आहे. परभणी विधानसभा मतदारसंघात विद्यमान शिवसेनेचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी सर्वच विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करत मोठा विजय मिळवला. तर रासपच्या रत्नाकर गुट्टे यांनी कारागृहातून गंगाखेडची लढाई जिंकली आहे. तसेच पाथरीत मागच्यावेळी निसटता पराभव स्वीकारणाऱ्या काँग्रेसच्या सुरेश वरपूडकरांनी यंदा मात्र बाजी मारली. जिंतूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार विजय भांबळे यांना धूळ चारत भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी विधानसभा गाठली आहे.
- live updates
- 11.01 am - पाथरी मतदारसंघातून 6 हजार 929 मतांनी आघाडीवर
- 10.55 am - गंगाखेड मतदारसंघातून विशाल कदम 5 हजार 664 मतांनी आघाडीवर
- 10.41 am - गंगाखेड मतदारसंघातून सेनेचे विशाल कदम 7 हजार 233 मतांनी आघाडीवर
- 10.35 am - जिंतूर मतदारसंघातून भाजपचे मेघना बोरिडीकर 843 मतांनी आघाडीवर
- 10.28 am - जिंतूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विजय भांबळे 79 मतांनी आघाडीवर
- 10.10 am - पाथरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मोहन फड 2 हजार 436 मतांनी आघाडीवर
- 10.00 am - परभणी विधानसभा सेनेचे डॉ. राहुल पाटील आघाडीवर
- 9.30 am - जिंतूर मतदारसंघातून भाजपच्या मेघना बोरिडीकर 41 मतांनी आघाडीवर
- 8.50 am - गंगाखेड मतदारसंघातून रत्नाकर गुट्टे 156 मतांनी आघाडीवर
- 8.31 am. - पाथरी मतदारसंघातून काँग्रेसचे सुरेश बरपुडकर 2 हजार 580 मतांनी आघाडीवर
- 8.00 am. - पोस्टल मतमोजणीला सुरुवात
परभणी - परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात परभणी विधानसभा मतदार संघासाठी मतमोजणी आठ वाजून दहा मिनिटांनी सुरू झाली आहे. तत्पूर्वी निवडणूक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी मॅकड्रिल घेऊन पूर्वतयारी केली आहे. शिवाय पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आला आहे.
दरम्यान, परभणी जिल्ह्यात दोन मतदार संघांमध्ये काट्याची टक्कर दिसून येते. त्यातल्यात्यात गंगाखेड मतदारसंघात बहुरंगी लढत होत असल्याने अंदाज बांधणे कठीण आहे, असे असले तरी त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला पोषक वातावरण असल्याचे सांगितले जाते. याशिवाय परभणी, पाथरी आणि जिंतूर या ठिकाणीदेखील माहितीच्या उमेदवाराला संधी मिळेल, असेही बोलले जाते; परंतु दुपारनंतर नेमका काय निकाल लागतो, हे स्पष्ट होणार आहे.