ETV Bharat / state

सातबाऱ्यावर आपले नाव नाही, याचा धक्का सहन न झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू - parbhani

पीकविमा भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला त्याचे नाव सातबाऱ्यावर नाव नसल्याचे आढळले. हा धक्का त्यांना सहन झाला नाही आणि त्याला हृदय विकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला.

आमदार बाबाजानी दुर्रानी आणि इतर
author img

By

Published : Jul 24, 2019, 12:58 AM IST

परभणी - पीकविमा भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला त्याचे नाव सातबाऱ्यावर नसल्याचे समजले, हा धक्का त्याला सहन झाला नाही आणि त्याला हृदय विकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना मंगळवारी पाथरी तालुक्यातील तुरा गावात घडली. दरम्यान, या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याच्या मागणी नातेवाईकांनी केली आहे.

सातबाऱ्यावर नाव नसल्याच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

मुंजाभाऊ दादाराव चाळक (50) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून तो पाथरी तालुक्यातील तुरा येथील रहिवासी होता. खरिप पीकविमा भरण्याची अंतिम तारीख 24 जुलै असल्याने तो पाच दिवसांपूर्वी ऑनलाईन केंद्रावर गेला होता. परंतु, तेथे सातबाऱ्यामध्ये त्याचे नाव नसल्याचे आढळले. त्यामुळे त्याने तलाठ्याकडे चकरा मारल्या. मंडळ अधिकारी यांनाही प्रकरणाविषयी माहिती दिली असल्याचे, नातेवाईकांनी सांगितले. मात्र, 'आता विमा भरण्यासाठी एकच दिवस कालावधी बाकी आहे आणि सातबारावर नाव नाही !' याचा धक्का त्याला बसला. त्यात मुंजाभाऊ चाळक याचा मंगळवारी हदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहातून मुंजाभाऊ यांचा मृतदेह ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी त्यांना अडवले. 'जशी तक्रार द्याल, तशी नोंद करू, अशी भूमीका पोलिसांनी मांडली.' मात्र, जमाव मृतदेह तहसील कार्यालयाच्या प्रांगणात नेण्यावर ठाम होता. संबंधीत दोषीला तात्काळ निलंबीत करा आणि मृत शेतकऱ्याला 10 लाख रुपये देऊन त्याच्या कुटूंबाचे पुनर्वसन करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सायंकाळी घटनास्थळी आलेल्या आमदार बाबाजानी दुर्रानी, कॉम्रेड राजन क्षिरसागर, उपविभागीय अधिकारी व्हि.एल. कोळी, तहसिलदार भाग्यश्री देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक डि. डि. शिंदे यांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केले.

Intro:परभणी - पीकविमा भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला त्याचे नावच सातबारावरून उडाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे हा धक्का सहन न झालेल्या या शेतकऱ्याचा हृदय विकाराच्या झटक्यात मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना मंगळवारी पाथरीत घडली. दरम्यान, या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी जोरदार गोंधळ घातल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.Body:मुंजाभाऊ दादाराव चाळक (वय ५०) असे या मयत शेतकऱ्याचे नाव असून ते पाथरी तालुक्यातील तुरा येथील रहिवासी आहेत. खरीप पिकविमा भरण्याची अंतिम तारीख २४ जुलै असल्याने ते पाच दिवसांपूर्वी ऑनलाईन केंद्रावर गेले होते. परंतु तेथे सातबारामध्ये त्यांचे नाव नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या शेतक-याने गावच्या तलाठ्याकडे चकरा मारल्या. मंडळ अधिकारी यांनाही या विषयी माहिती दिली असल्याचे नातेवाईक सांगत आहेत. परंतु 'आता एकच दिवस विमा भरण्यासाठी बाकी आहे आणि सातबारावर नाव नाही', याचा धक्का त्यांना बसला. त्यात मुंजाभाऊ चाळक यांचा मंगळवारी दुपारच्या सुमारास -हदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहातून मयत मुंजाभाऊ चाळक यांचे शव ताब्यात घेऊन ते तहसील कार्यालयात खाजगी जिप मधून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी त्यांना रोकले. 'जशी तक्रार द्याल, तशी नोंद करू, अशी भूमीका पोलिसांनी मांडली. मात्र जमाव शव तहसिलच्या प्रांगणात नेण्यावर ठाम होते. संबंधीत दोषीला तात्काळ निलंबीत करा आणि मयत शेतक-याला दहा लक्ष रुपये देऊन त्याच्या कुटूंबाचे पुनर्वसन करा, अशी मागणी ग्रामस्थांनी लाऊन धरली होती.
दरम्यान, सायंकाळी घटनास्थळी आलेल्या आमदार बाबाजानी दुर्रानी, कॉम्रेड राजन क्षिरसागर, उपविभागीय अधिकारी व्हि.एल. कोळी, तहसिलदार भाग्यश्री देशमुख, उपविभागिय पोलीस अधिकारी, पोलिस निरीक्षक डि. डि. शिंदे यांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- vis. Vo. Pkg (Pbn_pathri_farmer_death_vis_vo_pkgConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.