ETV Bharat / state

MLA Durrani Resignation : परभणीत आमदार दुर्राणीनंतर असंख्य पदाधिकार्‍यांचे राजीनामे - MLA Babajani Durrani resigns

आमदार दुर्राणी यांच्या अन्य शेकडो समर्थकांनी ( MLA Durrani Supporters Resign )सामूहिक राजीनामे दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससाठी ( NCP ) हा मोठा फटका मानला जात आहे.

राजीनामे दिलेले पदाधिकारी
राजीनामे दिलेले पदाधिकारी
author img

By

Published : Nov 25, 2021, 8:29 PM IST

Updated : Nov 26, 2021, 2:52 PM IST

परभणी - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी ( MLA Babajani Durrani Resigns ) यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे पाठवला आहे. त्यांचा राजीनामा अद्याप पक्षश्रेष्ठीने मंजूर केला नसला तरी आमदार दुर्राणी यांच्या अन्य शेकडो समर्थकांनी ( Supporters Resign )सामूहिक राजीनामे दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससाठी ( NCP ) हा मोठा फटका मानला जात आहे. आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यानंतर नाराज झालेल्या समर्थकांची आज (गुरुवारी) परभणीत आमदार दुर्राणी यांच्या संपर्क कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी शेकडोच्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्या सर्वांनीच माध्यमांकडे तीव्र भावना व्यक्त केली.

आमदार दुर्राणी विरुद्ध गट सक्रिय

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागील काही दिवसांपासून अंतर्गत कलहाचे वातावरण दिसून येत आहे. जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांना डावलून त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणारा एक गट सक्रिय झाला आहे. त्यामुळे पक्षातंर्गत सुरु असलेल्या गटबाजीला कंटाळून अखेर जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे पाठवला आहे. दुर्राणी यांच्या राजीनाम्यामुळे समर्थकांत अस्वस्थता पसरली आहे. कारण जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष वाढीस आमदार दुर्राणी यांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहे. त्यांच्यामुळे जिल्ह्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राष्ट्रवादी सत्तेत आहे. परिणामी या कार्यकर्त्यांची खूप मोठी फळी त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे आमदार दुर्राणी यांनी राजीनामा देताच जवळपास ३७९ पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी देखील सामूहिक राजीनामे दिले असून, ते देखील पक्षश्रेष्ठीकडे पाठविण्यात येणार आहेत.

यांनी दिले राजीनामे

राजीनामे देणाऱ्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस नानासाहेब राऊत, महिला जिल्हाध्यक्षा भावना नखाते, जिल्हा कार्याध्यक्ष किरण सोनटक्के, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष दत्ता मायंदळे, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शेर खान पठाण, आयटी सेल जिल्हाध्यक्ष अमोल भाले पाटील, ओबीसी महिला जिल्हाध्यक्षा कमल राठोड, ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष कृष्णा कटारे, जिल्हा उपाध्यक्ष नारायण मुंडे, सुभाष कोल्हे, उगले, चक्रधर पाथरी विधानसभा अध्यक्ष माधवराव जोगदंड, रायुकाँ उपाध्यक्ष संदीप टेंगसे, निखील जिल्हा कदम, पाथरी तालुकाध्यक्ष एकनाथ शिंदे, मानवत तालुकाध्यक्ष संतोष लाडाणे, अहेमद अत्तार, शेख खालेद, सुनिल कन्हाळे, सदाशिव थोरात, रायुकाँ विधानसभा अध्यक्ष कृष्णा दळणर, संजय ढवळे, प्रदेश संघटक विठ्ठल तळेकर, परभणी जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत, उत्तम शिंदे, आशिष आशिष हरकळ, अल्पसंख्याक विभाग गंगाखेड तालुकाध्यक्ष अकबर खान इनायततुल्ला खान, परभणी शहर सचिव गंगाधर यादव, मानवत महिला तालुकाध्यक्षा मिरा वानखेडे, पाथरी विधानसभा अध्यक्षा मिरा सरोदे आदीसह शेकडो जणांनी राजीनामे पक्षाकडे पाठविले आहेत.

काँग्रेस, सेना, भाजपाकडून संपर्क

दरम्यान, बाबाजानी दुराणी यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपाचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे नजीकचे सहकारी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व शिवसेनेचे विधान परिषदेतील काही वरिष्ठनेते यांनी काल फोनवरून आमदार दुर्राणी यांच्याशी संपर्क साधला आहे. सर्वधर्म समभाव या न्यायाने कार्य करणारे नेतृत्व आमच्या पक्षात आल्यास सन्मानपूर्वक आपले पुनर्वसन करू, असा विश्वास दिला जात आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही मंगळवारी मुंबईत या, भेटून मार्ग काढूयात, असे कळवले आहे. त्यामुळे आमदार दुर्राणी हे मंगळवारनंतर आपल्या कार्यकर्त्यांशी बोलून अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती त्यांच्यावतीने देण्यात आली आहे.

'पक्षश्रेष्ठीने वेळेत लक्ष द्यावे'

20 वर्षांपासून राष्ट्रवादीचे काम केलेले कार्यकर्ते आज अडवळणीत पडत चालले आहेत. आमदार बाबाजानी दुर्राणी सारख्या व्यक्तीला पक्षाकडून अशी वागणूक मिळाली नाही पाहिजे. पक्षाने वेळीच लक्ष न दिल्यास राष्ट्रवादीचे मोठे नुकसान होईल. सामान्य कार्यकर्ता हाच पक्षाचा मजबूत खांब असल्याची प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा - Nawab Malik Allegations : समीर वानखेडे यांनी दुहेरी ओळख पत्राद्वारे कागदपत्रात घोळ केला - नवाब मलिकांचा नवा आरोप

Last Updated : Nov 26, 2021, 2:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.