ETV Bharat / state

परभणीत दुकानदाराकडून लॉकडाऊनचे उल्लंघन; मध्यरात्रीच्या कारवाईत दुकानात आढळले 100 ग्राहक! - परभणी

मंगळवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास अशाच एका दुकानदारावर नानलपेठ पोलिसांनी कारवाई केली आहे. परभणी शहराच्या मुख्य बाजारपेठेतील शिवाजी चौक भागात असलेल्या या दुकानात सुमारे 100 ग्राहक यावेळी आढळून आले.

परभणीत दुकानदाराकडून लॉकडाऊनचे उल्लंघन; मध्यरात्रीच्या कारवाईत दुकानात आढळले 100 ग्राहक!

author img

By

Published : May 5, 2021, 10:09 AM IST

परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून परभणीत गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, अनेक व्यापारी बंद शटरच्या आतून व्यवहार करताना आढळून येत आहेत. गेल्या 2 दिवसांत अशा दुकानदारांवर कारवाई करण्याचे सत्र पोलीस आणि मनपा प्रशासनाने सुरू केले आहे. या दरम्यान काल मंगळवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास अशाच एका दुकानदारावर नानलपेठ पोलिसांनी कारवाई केली आहे. परभणी शहराच्या मुख्य बाजारपेठेतील शिवाजी चौक भागात असलेल्या या दुकानात सुमारे 100 ग्राहक यावेळी आढळून आले.

परभणीत मध्यरात्रीच्या कारवाईत दुकानात आढळले 100 ग्राहक!
मनपाकडून होणार दंडात्मक कारवाईदिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत असून, या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या दरम्यान कुठल्याही दुकानदाराने व्यवहार करू नये, एका जागी 5 हुन अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये असे अपेक्षित असताना परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील इम्प्रेशन नावाच्या कपड्याच्या (शोरूम) दुकानात व्यवहार सुरू असल्याचे नानलपेठ पोलिसांना आढळून आले. मंगळवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास नानलपेठ पोलिसांनी या दुकानाला भेट दिली असता, बाहेरून शटर लावलेल्या या दुकानाच्या आतमध्ये जवळपास 100 ग्राहक खरेदी करत होते. पोलिसांनी तात्काळ या ग्राहकांना बाहेर काढून दुकानदारावर कारवाई केली. मध्यरात्री या संदर्भातील नोंद नानलपेठ पोलिसांनी दाखल करून घेतली. यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत आज (बुधवारी) दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.दोन दिवसांत 30 दुकानदारांवर दंडात्मक कारवाईपरभणी शहरात महापालिकेने नानलपेठ पोलिसांच्या पथकासह 2 दिवसात 30 दुकांदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे. दुकाने सुरू ठेवल्याप्रकरणी या दुकानदारांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहरात सध्या लॉकडाऊन आहे. परंतु काही दुकानदार परवानगी नसतानाही दुकाने सुरू ठेवत असल्याचे निदर्शनास येऊ लागल्याने परभणी महापालिकेच्या वतीने कारवाई केली जात आहे. या अंतर्गत सोमवारी आयुक्त देविदास पवार यांच्या आदेशानुसार व सहाय्यक आयुक्त अल्केश देशमुख यांच्या नियंत्रणाखाली नानलपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे तसेच तिब्बतवाड यांच्यासोबत संयुक्त कारवाई करत कच्छी बाजार, जनता मार्केट, शिवाजी चौक या ठिकाणी दुकाने चालू ठेवल्याबद्दल 17 दुकानदारांकडून प्रत्येकी 5 हजार रुपये प्रमाणे 85 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.मंगळवारीही कारवाईमंगळवारी देखील कारवाई सुरू ठेवत मनपाच्या पथकाने परभणी शहरातील 13 दुकानदारांवर प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे 65 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. हे दुकानदार बंद शटरमधून आपला व्यवहार सुरू ठेवत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले होते. या कारवाईमध्ये मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, प्रशिक्षणार्थी स्वच्छता निरीक्षक विनायक बनसोडे, मुकादम भिमराव लहाने, प्रकाश काकडे यांच्यासह नानलपेठ पोलिसांचा सहभाग होता.विनामास्क फिरणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाईदरम्यान, शहरात सोमवारी विनामस्क फिरणाऱ्या एकूण 23 नागरिकांवर कारवाई करत 4 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला. या प्रमाणेच मंगळवारी देखील विनामास्क फिरणाऱ्या सुमारे 30 नागरिकांवर 200 रुपये प्रमाणे दंड वसूल करून कारवाई करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.