ETV Bharat / state

सामूहिक कॉपी चालणाऱ्या शाळेतील 11 शिक्षकांवर कारवाई ; परभणी झेडपी सीईओंचा दणका - 11 शिक्षक

या ठिकाणी काही अनाधिकृत शिक्षक, वसतिगृह कर्मचारी यांच्या माध्यमातून परीक्षेदरम्यान अनियमितता व गैरप्रकार होत असल्याचे पथकास आढळून आले. काही कर्मचारी विद्यालयाच्या वरच्या मजल्यावर एक रूम बंद करून बाहेर पहारा देत असल्याचेही सापडले.

सामूहिक कॉपी चालणाऱ्या शाळेतील 11 शिक्षकांवर कारवाई ; परभणी झेडपी सीईओंचा दणका
author img

By

Published : Mar 13, 2019, 11:34 PM IST

परभणी - जिल्हा परिषदेचे सीईओ पृथ्वीराज बी. पी. यांनी पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथील हायटेक विद्यालयात धडक कारवाई केली. १० वीच्या परीक्षेदरम्यान होत असलेल्या सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आणला. या प्रकारास जबाबदार असलेल्या केंद्रसंचालकासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओंनी दिले. यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सध्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेदरम्यान बुधवारी भूमितीचा पेपर होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांच्या नेतृत्वात भरारी आणि बैठ्या पथकाने एरंडेश्वर येथील हायटेक विद्यालय या परीक्षा केंद्राला अचानक भेट दिली. परीक्षा सुरू असताना सीईओ बी. पी. पृथ्वीराज यांच्यासह पथकातील गटविकास अधिकारी एस. आर.कांबळे, औरंगाबाद विभागाचे अधीक्षक ए.बी.जाधव, पर्यवेक्षक के.एम.अंबुलगेकर, एस. डी. ससाणे यांचे भरारी पथक आणि बैठे पथकातील ज्योती गऊळकर, बी.एल.रब्बेवार, जी.डी गायकवाड, एस.के.बंडेवाड परीक्षा केंद्रात पोहोचले.

या ठिकाणी काही अनाधिकृत शिक्षक, वसतिगृह कर्मचारी यांच्या माध्यमातून परीक्षेदरम्यान अनियमितता व गैरप्रकार होत असल्याचे पथकास आढळून आले. काही कर्मचारी विद्यालयाच्या वरच्या मजल्यावर एक रूम बंद करून बाहेर पहारा देत असल्याचेही सापडले. या रूममध्ये गैरप्रकार होत असल्याचे तपासणीत समोर आले. हा प्रकार सीईओ बी. पी. पृथ्वीराज आणि त्यांचा पथकास धक्का देणारा ठरला. हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर पथकाने तात्काळ कारवाई सुरू केली.

Intro:परभणी - परभणी जिल्हा परिषदेचे सीईओ पृथ्वीराज बी.पी. यांनी पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथील हायटेक विद्यालयात धडक कारवाई करीत 10 वीच्या परीक्षेदरम्यान होत असलेल्या सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आणला. विशेष म्हणजे या प्रकारास जबाबदार संबंधित केंद्रसंचालकासह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओंनी दिले असून, यामुळे शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे.Body:सध्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षे दरम्यान आज (बुधवारी) भूमितीचा पेपर होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांच्या नेतृत्वात भरारी आणि बैठे पथकाने एरंडेश्वर येथील हायटेक विद्यालय या परीक्षा केंद्राला अचानक भेट दिली. परीक्षा सुरू असतांना सीईओ बी.पी.पृथ्वीराज यांच्यासह पथकातील गटविकास अधिकारी एस.आर.कांबळे, औरंगाबाद विभागाचे अधीक्षक ए.बी.जाधव, पर्यवेक्षक के.एम.अंबुलगेकर, एस.डी.ससाणे यांचे भरारी पथक आणि बैठे पथकातील ज्योती गऊळकर, बी.एल.रब्बेवार, जी.डीग़ायकवाड, एस.के.बंडेवाड परीक्षा केंद्रात पोहोचले. या ठिकाणी काही अनाधिकृत शिक्षक, वसतिगृह कर्मचारी यांच्या माध्यमातून परीक्षे दरम्यान अनियमितता व गैरप्रकार होत असल्याचे पथकास आढळून आले. काही कर्मचारी विद्यालयाच्या वरच्या मजल्यावर एक रूम बंद करून बाहेर पहारा देत असल्याचेही सापडले. या रूममध्ये बसून गैरप्रकार होत असल्याचे तपासणीत समोर आले. हा प्रकार सीईओ बी.पी.पृथ्वीराज आणि त्यांचा पथकास धक्का देणारा ठरला. हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर पथकाने तात्काळ कारवाई सुरू केली.
यात केंद्र संचालक प्रदीप जाधव यांच्यासह बालाजी बनसोडे, प्रभू भुसारे, शेषराव भुसारे, अनंता भुसारे, विरेंद्र भुसारे, शंकर पवार, मारोती भुसारे, विठ्ठल भालेराव, धम्मपाल रणवीर आणि संतोष मोरतळे हे दहा व्यक्ती गैरप्रकार आणि अनियमिततेसाठी सहकार्य करीत आसल्याचे आढळून आले. त्यानंतर या सर्व व्यक्तींवर महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ व अन्य विनिर्दिष्टीत होणाऱ्या परीक्षेतील गैरप्रकारात प्रतिबंधित अधिनियम १९८२ चे कलम ७ व अन्य प्रचिलित कायदे शासन निर्णय व शासकीय धोरण, तसेच भादंविनुसार कारवाई करण्याच्या सूचना सीईओ पृथ्वीराज यांनी पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना दिले असून संध्याकाळपर्यंत एफआयआरची कॉपी सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
एकीकडे परीक्षा सुरळीत चालत असल्याचे सांगण्यात येत असताना स्वतः सीईओनीच परीक्षेदरम्यान चालणारा गैरप्रकार उघडकीस आणल्याने शिक्षण विभागाचा ढोंगी बुरखा फाटला आहे.
- गिरीराज भगत, परभणी
- सोबत फोटो पृथ्वीराज बी.पी.
- Vis :- जिल्हा परिषद.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.