ETV Bharat / state

रक्षाबंधनासाठी जाणाऱ्या भावाचा दुचाकी अपघातात मृत्यू; महिला आणि मुलगाही जखमी - ज्ञानेश्वर भालेराव अपघात मृत्यू

रक्षाबंधनानिमित्त राखी बांधण्यासाठी दुचाकीवरून बहिणीकडे जाणाऱ्या भावावर काळाने घाला घातला. पूर्णा तालुक्यातील ताडकळस रस्त्यावरील कानडखेड शिवारात या भावाची दुचाकी पाण्याच्या टँकरला धडकली. या अपघातात 32 वर्षीय भावाचा जागीच मृत्यू झाला.

Dnyaneshwar Bhalerao accident death Kanadkhed
ज्ञानेश्वर भालेराव अपघात मृत्यू कानडखेड
author img

By

Published : Aug 22, 2021, 8:23 PM IST

परभणी - रक्षाबंधनानिमित्त राखी बांधण्यासाठी दुचाकीवरून बहिणीकडे जाणाऱ्या भावावर काळाने घाला घातला. पूर्णा तालुक्यातील ताडकळस रस्त्यावरील कानडखेड शिवारात या भावाची दुचाकी पाण्याच्या टँकरला धडकली. या अपघातात 32 वर्षीय भावाचा जागीच मृत्यू झाला. तर, त्याचा मुलगा आणि भावजयी गंभीर जखमी झाले.

हेही वाचा - प्रहारकडून रस्त्यांवरील खड्डे बुजवून परभणी महानगरपालिकेचा निषेध

ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी घडली दुर्दैवी घटना

भावा-बहिणीच्या नात्याचा रक्षाबंधन हा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. सर्वत्र आनंद असताना मात्र, या दोन परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. बहिणीच्या गावी दुचाकीवरून जाणाऱ्या या भावावर ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी काळाने घाला घातला. पूर्णा-ताडकळस रस्त्यावर कानडखेड शिवारात आज रविवारी दुचाकी-पाण्याच्या टँकरचा अपघात घडला. यात ज्ञानेश्वर शिवाजी भालेराव (वय ३२ रा. खुजडा ता. पूर्णा) यांचा मृत्यू झाला.

पाण्याचा टँकरला धडकली दुचाकी

ज्ञानेश्वर भालेराव हे आज आपल्या ५ वर्षीय मुलगा साईनाथ व भावजय गयाबाई प्रकाश मालेराव (वय २८) यांना सोबत घेऊन नांदेड जिल्ह्यातील निळा येथे बहिणीकडे रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी जात होते. दुपारच्या सुमारास खुजडा येथून पूर्णा ताडकळस रस्त्याने ते जात होते. कानडखेड शिवारातील बळीराजा हॉटेल जवळ समोरून येणाऱ्या भरधाव वाहनास चुकवण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरला (एम.एच. ०४ सिजी - ५५००) मागून त्यांची दुचाकी (एम.एच. २२ एके - ४१४) धडकली.

बहीण-भावाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी टॅंकरच्या पाठीमागून धडकल्याने दुचाकीस्वार ज्ञानेश्वर भालेराव यांना डोक्यात व छातीला जोरदार मार लागला. तर, ५ वर्षीय मुलगा साईनाथ आणि भावजय गयाबाई यांना गंभीर दुखापत झाली. घटनास्थळावर परिसरातील शेतकरी व वाहनधारकांनी जखमींना तातडीने जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु ज्ञानेश्वर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

हेही वाचा - राज्याचा कारभार अत्यंत बेशिस्तपणे चाललाय - केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांचे टीकास्त्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.