ETV Bharat / state

परभणीत आढळले ६२० नवीन कोरोनाबाधित, २३ रुग्णांचा मृत्यू - Today 620 new patients

जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या गेल्या ४ दिवसांपासून काही प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून येत आहे. आज शुक्रवारी ६२० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ६८४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान आजपर्यंत १००६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

परभणीत आढळले ६२० नवीन कोरोनाबाधित, २३ रुग्णांचा मृत्यू

author img

By

Published : May 7, 2021, 10:07 PM IST

परभणी - जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या गेल्या ४ दिवसांपासून काही प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून येत आहे. आज शुक्रवारी ६२० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ६८४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान आजपर्यंत १००६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

सध्या परभणी जिल्हा रुग्णालयात ७ हजार ७६३ कोरोना रूग्ण उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत एकूण १ हजार ६ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ४२ हजार ७२ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ३३ हजार ३०३ व्यक्ती कोरोनामुक्त झाले. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत २ लाख ६० हजार ७४९ व्यक्तींची नव्याने चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये २ लाख १८ हजार ५७५ व्यक्तींची चाचणी निगेटिव्ह आली, तर ४२ हजार ७२ व्यक्तींची चाचणी पॉझिटिव्ह आली.

२३ जणांचे मृत्यू
दरम्यान गेल्या २४ तासात २३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. यात १५ पुरुष तर ८ महिलांचा समावेश आहे. यात सर्वाधिक मृत्यू जिल्हा रुग्णालयात ४ तर जिल्हा रुग्णालयाच्याच आयटीआय इमारतीमधील कोरोना हॉस्पिटलमध्ये ७ आणि जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय परभणी आयसीयू २, चिरावू, सामले, स्वाती व देशमुख या खासगी हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी १ अशा एकूण 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

परभणी जिल्ह्यात ४७८ बेड शिल्लक
जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना हॉस्पिटलसह खाजगी मंगल कार्यालय आणि इतर इमारतींमधून ३० कोरोना हॉस्पिटल सुरू आहेत. या रुग्णालयांमध्ये १८३९ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी सध्या ४७८ बेड रिकामे आहेत. यामध्ये रेणूका हॉस्पिटल येथे १४६ बेड रिकामे असून, जिल्हा रुग्णालयाच्या आयटीआय हॉस्पिटलमध्ये ५६ बेड तर जिल्हा रुग्णालयात २, जिल्हा परिषद कोरोना हॉस्पिटल ५३, परभणी आयसीयू २, स्वाती १०, भारत हॉस्पिटल २७, डॉ. प्रफुल पाटील हॉस्पिटल २३, देशमुख ५, अक्षदा मंगल कार्यालय ४९, सूर्या ४, प्राईम १८, मोरे २, अनन्या २, सामले ६, सिद्धिविनायक ३, ह्यात ९, सुरवसे मॅटर्निटी ३, पार्वती ८, देहरक्षा १७, स्पर्श हॉस्पिटल १६, तर गोकुळ हॉस्पिटलमध्ये ७ बेड शिल्लक आहेत. तर ६ हजार ४०६ रुग्ण घरून (होम आयसोलेशन) उपचार घेत आहेत. दरम्यान, नव्याने बाधित होणाऱ्या कोरोना रुग्णांनी बेड शिल्लक नसल्याच्या अफवांवर विश्वास न ठेवता या रुग्णालयांमध्ये संपर्क साधून उपचार घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा- महाराष्ट्रात तिसरी ऑक्सिजन एक्सप्रेस शनिवारी होणार दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.