ETV Bharat / state

परभणीत तीन अट्टल दरोडेखोर गजाआड - परभणीत तीन अट्टल दरोडेखोर गजाआड

किशन ऊर्फ पप्पु गोविंदराव बईद (वय २३), निलेश ऊर्फ लल्लू नारायण जाधव (वय १९ वर्षे), श्रीकृष्ण ऊर्फ शेंडी आश्रोबा बोबडे (सर्व रा.बोबडे टाकळी ता.जि.परभणी) यांना शिताफीने जेरबंद करुन त्यांच्या मुसक्या आवळल्या. या आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी वरील दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली असून चोरीस गेलेले ट्रॅक्टरचे हेड, कापड दुकानातील कपडे असा मुद्येमाल देखील या आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे.

परभणी
author img

By

Published : Nov 19, 2019, 9:35 PM IST

परभणी - विविध शहरांमधील दुकाने फोडून सामान, पैसे लंपास करणारे तसेच 8 दुचाकी गाड्या पळवणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना परभणी पोलिसांनी अटक केले आहे. त्यांच्यावर ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, आणखी चौकशी करण्यात येत आहे.

हेही वाचा - बियाण्यावरील मक्तेदारी थांबवा..

पूर्णा तालुक्यातील ताडकळस पोलीस ठाण्यात चंद्रकांत किशनराव रुद्रवार यांच्या ट्रॅक्टरचे हेड चोरी व ओम कलेक्शन हे कापड दुकान फोडल्याचे गुन्हे दाखल झाले होते. सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस.एन. लहाने व त्यांच्या पथकातील भारत तावरे, बाबासाहेब रोडे, माधव जंगम, धनंजय कनके यांनी सायबर सेलच्या माध्यमातून आरोपींचा माग काढला.

किशन ऊर्फ पप्पु गोविंदराव बईद (वय २३), निलेश ऊर्फ लल्लू नारायण जाधव (वय १९ वर्षे), श्रीकृष्ण ऊर्फ शेंडी आश्रोबा बोबडे (सर्व रा.बोबडे टाकळी ता.जि.परभणी) यांना शिताफीने जेरबंद करुन त्यांच्या मुसक्या आवळल्या. या आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी वरील दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली असून चोरीस गेलेले ट्रॅक्टरचे हेड, कापड दुकानातील कपडे असा मुद्येमाल देखील या आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या चोरट्यांनी पूर्णा हद्दीतून दोन मोटारसायकल, दैठणा हद्दीतील एक मोटारसायकल, परभणी ग्रामीण हद्दीतील एक मोटारसायकल, परभणीच्या नवामोंढा व नानलपेठ, वसमत, हट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन प्रत्येकी एक मोटारसायकल चोरी केल्याची व पानपट्टी फोडल्याची देखील कबुली दिली आहे.

याशिवाय औंढा येथे एक मोटारसायकल चोरून झेरॉक्स दुकानातील झेरॉक्स मशिन, कॉम्प्युटर, इनव्हर्टर पळवले आहे. तसेच मोबाईल शॉपी व दोन पानपट्टी फोडल्याची कबुलीसुद्धा दिली आहे.

त्यानुसार या चोरट्यांनी एकुण ८ मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली असून या सर्व गुन्ह्याची उकल ताडकळस पोलिसांनी केली आहे. यासाठी त्यांना सायबर सेलचे पोलीस कर्मचारी गणेश कौटकर व भुमकर यांनी सहकार्य केले.

Intro:

परभणी - विविध शहरांमधील दुकाने फोडून सामान, पैसे लंपास करणारे तसेच 8 दुचाकी गाड्या पाळणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना परभणी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्यावर ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, आणखीन चौकशी करण्यात येत आहे.Body:

पूर्णा तालुक्यातील ताडकळस पोलीस ठाण्यात चंद्रकांत किशनराव रुद्रवार यांच्या ट्रॅक्टरचे हेड चोरी व ओम कलेक्शन हे कापड दुकान फोडल्या गुन्हे दाखल झाले होते. सदर गुन्हयाचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस.एन. लहाने व त्यांच्या पथकातील भारत तावरे, बाबासाहेब रोडे, माधव जंगम, धनंजय कनके यांनी
सायबर सेल च्या माध्यमातून आरोपींचा माग काढला. किशन ऊर्फ पप्पु गोविंदराव बईद (वय २३), निलेश ऊर्फ लल्लू नारायण जाधव (वय १९ वर्षे), श्रीकृष्ण ऊर्फ शेंडी आश्रोबा बोबडे (सर्व रा.बोबडे टाकळी ता.जि.परभणी) यांना शिताफीने जेरबंद करुन त्यांच्या मुसक्या आवळल्या. या आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी वरील दोन्ही गुन्हे केल्याची कबुल दिली असून चोरीस गेलेले ट्रॅक्टरचे हेड, कापड दुकानातील कपडे असा मुद्येमाल देखील या आरोपीकडुन जप्त करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या चोरट्यांनी पुर्णा हद्दीतून दोन मोटार सायकल, दैठणा हद्दीतील एक मोटार सायकल, परभणी ग्रामीण हद्दीतील एक मोटार सायकल, परभणीच्या नवामोंढा व नानलपेठ, वसमत, हट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन प्रत्येकी एक मोटार सायकल चोरी केल्याची व पाननट्टी फोडल्याची देखील कबुली दिली आहे.
या शिवाय औंढा येथे एक मोटार सायकल चोरून झेरॉक्स दुकानातील झेरॉक्स मशिन, कॉम्प्युटर, इनव्हर्टर पळविले आहे. तसेच मोबाईल शॉपी व दोन पानपट्टी फोडल्याची कबुली सुद्धा दिली आहे.
त्यानुसार या चोरट्यांनी एकुण ८ मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली असून या सर्व गुन्हयाची उकल ताडकळस पोलीसांनी केली आहे. यासाठी त्यांना सायबर सेलचे पोलीस कर्मचारी गणेश कौटकर व भुमकर यांनी सहकार्य केले.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- photo & sp office vis.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.