ETV Bharat / state

Truck-Bike Accident Near Jintur : जिंतूरजवळ ट्रक-दुचाकीच्या अपघातात 3 भावंडांचा मृत्यू - ट्रक दुचाकीचा अपघात जिंतूर बातमी

परभणी येथील जिंतूर रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात दुचाकी-ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात ( Truck-Bike Major Accident ) दोन सख्या भावासह एका चुलत भावाचा जागीच मृत्यू झाला. ( 3 Brothers Died in Accident )

Truck-Bike Accident in Jintur
जिंतूरजवळ ट्रक-दुचाकीच्या अपघातात 3 भावंडांचा मृत्यू
author img

By

Published : Jan 24, 2022, 3:44 PM IST

परभणी - येथील जिंतूर रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात दुचाकी-ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात ( Truck-Bike Major Accident ) दोन सख्या भावासह एका चुलत भावाचा जागीच मृत्यू झाला. ( 3 Brothers Died in Accident ) ही घटना आज (सोमवारी) सकाळी 11 वाजेच्या सुमारास जिंतूर शहरापासून तीन किमी अंतरावरील अकोली शिवारात घडली.

ट्रकखाली चिरडल्याने तिघांचाही जागीच मृत्यू -

जिंतूर तालुक्यातील मालेगाव येथील अभिषेक काशिनाथ म्हेत्रे हा १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी आज सकाळी नेहमीप्रमाणे त्याचा १५ वर्षीय भाऊ योगेश काशिनाथ म्हेत्रे याला जिंतूर शहरातील जवाहर विद्यालयात तर २० वर्षीय चुलत भाऊ रामप्रसाद विश्वनाथ म्हेत्रे याला कामावर सोडण्याकरीता निघाला होता. दुचाकीने (एम.एच. २६- ए.व्ही. २८३४) ते जिंतूरकडे निघाले होता. मात्र, अकोली शिवारातील पुलाजवळ असलेला खड्डा चुकविण्याच्या नादात तो समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकला (क्रमांक एम.एच.१८. बी.जी. ६२७०) धडकला. त्यानंतर या ट्रकखाली ते तिघेही चिरडले गेले. या दुर्घटनेत तिन्ही भावंडांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा -

'मालेगाव'वर शोककळा -

दरम्यान, घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गोफणे, पोनि दिपक शिंदे, सपोनि. गायकवाड, पोकॉ. गायकवाड, महामार्गाचे कर्मचारी तसेच मालेगाव येथील पांडूरंग मुसळे, तुकाराम थिटे, ज्ञानेश्वर पांचाळ, नागेश आकात, रुग्णवाहिका चालक अरुण घुगे यांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अपघातात मरण पावलेले तिन्ही भावंडे राहत असलेल्या मालेगाव गावावर शोककळा पसरली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.